भाजपला खरोखरच महिला मतदारांमुळे ऐतिहासिक विजय मिळाला?

मुंबई तक

• 03:13 PM • 17 Mar 2022

नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश मिळालं. पण यावेळी असं म्हटलं गेलं की, महिला मतदारांनी भाजपला भरभरुन मतदान केलं. पण माझं म्हणणं आहे की, या दाव्याबाबत सर्व जाणकारांनी खूप मोठी चूक केली आहे. मतदार म्हणून महिला या अधिकाधिक महत्त्वाच्या होत आहेत. या गोष्टीशी मी सहमत… पण प्लीज.. प्लीज.. प्लीज जास्त स्त्री मतदार […]

Mumbaitak
follow google news

नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश मिळालं. पण यावेळी असं म्हटलं गेलं की, महिला मतदारांनी भाजपला भरभरुन मतदान केलं. पण माझं म्हणणं आहे की, या दाव्याबाबत सर्व जाणकारांनी खूप मोठी चूक केली आहे.

हे वाचलं का?

मतदार म्हणून महिला या अधिकाधिक महत्त्वाच्या होत आहेत. या गोष्टीशी मी सहमत… पण प्लीज.. प्लीज.. प्लीज जास्त स्त्री मतदार आहेत म्हणून एखादा पक्ष जिंकला किंवा एखादा पक्ष हरला असे म्हणण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. वाचकांना समजण्यासाठी मी इथे काही डेटा देत आहे. खरं तर हा मुख्यत्वे त्याचा एक विभाजक प्रभाव आहे.

यूपीमध्ये महिला मतदार एक कोटीहून कमी आहेत आणि माझी स्मरणशक्ती चांगली असेल तर एकूण संख्या 11.5 कोटी मतदार आहेत. 11.5 कोटी मतदार असून स्त्री-पुरुष मतदारांमध्ये 50 लाखांचं अंतर आहे.

मी सुरुवातीलाच म्हटलं आहे की, स्त्रिया मतदार म्हणून महत्त्वाच्याच आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे.

कदाचित महिला मतदारांच्या यांच्या विजयात मोठा वाटा आढळून येईल. परंतु एकूण पातळीवर कोणतीही चूक करू नका, सामाजिक आर्थिक कारणांमुळे महिलांची संख्या कमी आहे ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. म्हणजे मतदारांमध्ये कमी महिलांची नोंदणी आहे आणि त्यामुळे टक्केवारीच्या दृष्टीने महिलांची संख्या देखील कमी आहे.

यूपीमध्ये, पुरुष मतदार आणि महिला मतदारांमध्ये मतदार म्हणून 7 टक्के फरक आहे. त्यामुळे आकडेवारी जरी जास्त दिसत असली तरी त्यात तांत्रिक तफावत आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.

एकंदरीत भाजपला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 38 टक्के मते मिळाली आहेत. यातून जर आपण अल्पसंख्याकांना हटवले आणि आपण फक्त 80 टक्के मतदारांविषयी विचार केला तरी 80 टक्के हिंदूंपैकी भाजपला जवळजवळ 40 ते 50 टक्के हिंदूंची मते मिळत आहेत. त्यावरच त्यांचा विजय निश्चित होतो.

मतदारांनी भाजपलाच मतदान का केलं; भाजपच्या मतदाराला कसं आकर्षित करता येईल?

या देशातील विरोधकांना भाजपला 2024 मध्ये पराभूत करणं शक्य आहे. हो खरंच शक्य आहे. फक्त जर तुम्ही आजपासून त्यासाठी कामाला लागाल तर ते शक्य होऊ शकतं. जर तुम्ही जानेवारी 2024 मध्ये जागे व्हाल आणि त्यानंतर विरोधकांची मोळी बांधण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाशी युती करण्याचा प्रयत्न केला तर मात्र भाजपला पराभूत करणं शक्य नाही.

    follow whatsapp