सरकार स्थापनेनंतर तब्बल पावणेतीन महिन्यानंतर जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सरकार स्थापन केलं. मात्र आधी मंत्रिमंडळ विस्तार आणि नंतर पालकमंत्री नेमण्यास विलंब झाला. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्याची घोषणा केली. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलीये.
ADVERTISEMENT
मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पालकमंत्री जाहीर कधी होणार, याची चर्चा गेला महिनाभरापासून सुरू होती. १५ ऑगस्ट आधी पालकमंत्री जाहीर होतील, असंही बोललं गेलं. मात्र पालकमंत्री नियुक्त केले गेले नाही. शनिवारी (२४ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली.
औरंगाबाद शिंदे गटाकडे; संदीपान भुमरेंची नाराजी दूर?
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपनं औरंगाबाद विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. अतुल सावे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय. दुसरीकडे शिवसेनेचे सर्वाधिक आमदार बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेले आहेत. त्यामुळे दोघांना शिंदेंकडून मंत्रिमंडळात संधी देण्यात आली.
अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे मंत्री झाले, मात्र औरंगाबादचं पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडे ठेवणार की शिंदे गटाला देणार याची उत्सुकता होती. औरंगाबादच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी संदीपान भुमरे यांच्याकडे देण्यात आलंय. अब्दुल सत्तार यांच्याकडे पालकमंत्री पद जाऊ शकतं, अशीही चर्चा होती. मात्र सत्तार यांना चांगलं खातं देण्यात आल्यानं पालकमंत्री पद देऊन संदीपान भुमरेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला केल्याचं बोललं जात आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोण असणार पालकमंत्री?
राधाकृष्ण विखे पाटील– अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया
चंद्रकांत पाटील – पुणे
विजयकुमार गावित -नंदुरबार
गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड
गुलाबराव पाटील – जळगाव, बुलढाणा
दादा भुसे -नाशिक
संजय राठोड – यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे – सांगली
संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत -परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार – हिंगोली
दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर
अतुल सावे – जालना, बीड
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
ADVERTISEMENT