ADVERTISEMENT
डोंबिवलीतील शांती उपवन कॉम्प्लेक्समध्ये एका इमारतीला भला मोठा तडा गेल्याची घटना शनिवारी (4 मार्च) रात्री घडली.
डोंबिवली परिसरात पाच इमारती असलेल्या या कॉम्प्लेक्समधून सर्वांना रात्रीच बाहेर काढावं लागलं.
240 कुटुंब या इमारतीत राहतात. त्यांना शाळा आणि मंदिरात ठेवण्यात आलं, पण सोयी-सुविधा नसल्यानं ते संतप्त झाले.
रविवारी (5 मार्च) शांती उपवन इमारतीतील रहिवाशांच्या संयमाचा कडेलोट झाला.
रात्री 8 च्या सुमारास पलावा चौक येथे संतप्त रहिवाशांनी रास्ता रोको आंदोलन केलं.
‘जोपर्यंत लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत घरं खाली करणार नाही’, असा पवित्राच रहिवाशांनी घेतला.
या आंदोलनात महिलांही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. रहिवाशांनी थेट रस्ताच अडवून ठेवला.
संतप्त रहिवाशी इमारतीला तडा गेल्यामुळे बेघर झाले आहेत. त्यांच्या इमारतीचं पाडकाम सुरू आहे.
हे पाडकाम केडीएमसीकडून सुरु असल्याने संतापलेल्या नागरिकांनी बिल्डर विरोधात रोष व्यक्त करत रास्ता रोको केलं.
ADVERTISEMENT