रिक्षातील प्रवाशाला रस्त्यात थांबवून चोरीच्या उद्देशाने दोन जणांना ठोशा बुक्क्यांनी तसंच चाकूने मारहाण करून त्यातील एकाची हत्या केली तर दुसऱ्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री रात्री साडे बाराच्या सुमारास ठाकुर्ली समांतर रस्ता परिसरात घडली होती. घटनेचं गुढ २४ तासांत उलगडलं आहे.
ADVERTISEMENT
ठाकुर्ली समांतर रस्ता परिसरात बेचनप्रसाद चौहान या तरुणाची हत्या करण्यात आली होती. तर बबलू चौहान याला जखमी करण्यात आलं होतं. या प्रकरणी डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस व रेल्वे पोलीसांनी तपास सुरू केल्यानंतर ही हत्या चोरीच्या उद्देशानं केली गेली नसल्याचं स्पष्ट झालं.
डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरामध्ये बेचन आणि बबलू चौहान हे भाड्याने राहत होते. उत्तरप्रदेश येथे गावी जाण्यासाठी काल (५ ऑक्टोबर) रात्री दीडच्या गाडीने कल्याण रेल्वे स्थानकाहून ते दोघे जाणार होते. त्यासाठी रिक्षाने ते शेलारनाका येथून साडे बाराच्या सुमारास ठाकुर्ली येथील समांतर रोडने जात होते.
त्याचवेळी अनोळखी इसमानी त्यांची रिक्षा अडवून रिक्षा चालकास पळवुन लावले. त्यानंतर बेचन आणि बबलू यांना चाकूच्या धाकाने त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करत त्यांना मारहाण करून शेजारील ठाकुर्ली रेल्वे ट्रॅकवर नेले. तेथे त्यांच्यावर चाकूने वार केले. यात बबलूने आरोपीच्या तावडीतून कसाबसा आपला जीव वाचून तेथून पळ काढला. मात्र बेचन हा त्यांच्या तावडीत सापडला.
जखमी बबलूने ही माहिती पहाटे शेलार नाका येथील घरी पोहचला घडलेला प्रकार त्याने भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांना सांगितला. या प्रकरणाची माहिती मिळताच ते जखमीला सोबत घेऊन टिळकनगर पोलीस ठाण्यात पोहचले. बबलूला बेचन जिवंत आहे की नाही याबाबत काहीच माहिती नव्हती. पोलीस बबलूने दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोचले.
त्याठिकाणी बेचनचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. लुटीच्या इराद्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती होती. ही हत्या की रेल्वे अपघात मृत्यू ? याचा तपास करण्यासाठी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रेल्वे पोलीस आणि टिळकनगर पोलीस घेऊन तपास चालू केला. मात्र तपासात पुढे आले की वरील कोणता प्रकार घडला नसून मित्रानेच मित्राचा खून केली.
मयत इसमास त्याच्या सोबत राहणारा व गावातील मित्र बबलू प्रसाद चौहान (वय 35) याने हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यास रेल्वे पटरीवर फेकून दिले असल्याचे निष्पन्न झाले. बेचन आणि बबलू चौहान हे दोघेही दारू पिऊन होते. रिक्षातून जात असताना ते एकमेकांशी भांडत होते. रिक्षाचालकास हे दारू पिऊन आहेत हे समजले, म्हणून रिक्षाचाकाने त्याला खाली उतरवले.
पुढे हे भांडणं वाढले आणि बबलू प्रसाद चौहान याने आपला मित्र बेचन चौहान याला ठार मारले आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यास रेल्वे पटरीवर फेकून दिले असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीवर डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बबलू प्रसाद चौहान याला अटक करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT