ADVERTISEMENT
बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांचं आयुष्य लपून नाही. काही कालाकारांच्या कहाण्या वेदनादायक, मन हेलावणाऱ्या असतात.
घरगुती हिंसाचाराची प्रकरणं बॉलिवूडमध्येही आहेत. करोडो रुपये कमावणाऱ्या अभिनेत्रींनाही त्याचा त्रास सहन करावा लागला आहे.
घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागलेल्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊयात.
वयाच्या 21 व्या वर्षी Miss World म्हणून भारताचं नाव उंचावणारी ऐश्वर्या राय तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
ऐश्वर्याने अभिनेता सलमान खानवर मारहाणीचा आरोप केला होता. त्यावेळी तिला या हिंसाचाराचा सामना करावा लागला.
अभिनेत्री करिश्मा कपूरलाही घरगुती हिंसाचार सहन करावा लागला. लग्नाच्या 10 वर्षानंतरच तिचा घटस्फोट झाला.
करिश्माने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केलं होतं. अनेक वेळा शिवीगाळ आणि मारहाण असा आरोप करिश्माने केला.
चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट जेव्हा रणवीर शौरीसोबत लिव्ह-इनमध्ये होती, तेव्हा तो दारू पिऊन तिला मारहाण करायचा.
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीही या यादीत आहे. तिनेही तिच्या एक्स पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.
अभिनेत्री रश्मी देसाईनेही तिचा एक्स पती नंदिशवर तिच्यावर संशय घेत असल्याचा आरोप केला होता. तो तिला काम करण्यापासूनही रोखायचा.
ADVERTISEMENT