सध्या अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यातला संघर्ष दिवसागणिक वाढत चालला आहे. तालिबानी फौजा अफगाणिस्तानच्या महत्वाच्या भागांवर आपला झेंडा रोवत असून प्रत्येक दिवस या हिंसाचारात अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. जागतिक पातळीवर अफगाणिस्तानचं नाव मोठं करणारा फिरकीपटू राशिद खानने ट्विटरच्या माध्यमातून जगभरातील नेत्यांना मदतीचं आवाहन केलं आहे.
ADVERTISEMENT
सध्याच्या घडीला तालिबानने अफगाणिस्तानच्या पुर्वोत्तर भागांवर नियंत्रण मिळवलं आहे.
अफगाणिस्तानात सुरु असलेल्या या संघर्षामुळे व्यथित झालेल्या राशिदने ट्विटरवर आपल्या भावना मांडल्या आहेत.
जगभरातील प्रिय नेत्यांनो, माझा देश सध्या संकटात आहे. सर्वत्र अराजकता आहे. प्रत्येक दिवशी हजारो निष्पाप नागरिक, महिला, मुलं आपला जीव गमावत आहेत. घरांचं नुकसान होत आहे, हजारो परिवार बेघर होत आहेत. आम्हाला अशा परिस्थितीत मरण्यासाठी सोडू नका, अफगाणिस्तानी नागरिकांच्या हत्या थांबवा…आम्हाला शांतता हवी आहे. राशिद खान इंग्लंडमध्ये सध्या ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत खेळत आहे.
अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तालिबानी फौजांची दहशत अफगाणिस्तानात वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच तालिबानने एका मुलीची घट्ट कपडे घालून एकटी फिरत असल्यामुळे हत्या केली.
ADVERTISEMENT