दृश्यम 2 ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई; पहिल्या 7 दिवसात 100 कोटींचा गल्ला, तोडले हे रेकॉर्ड

मुंबई तक

• 06:04 AM • 25 Nov 2022

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अजय देवगणने सिद्ध केले की तो 100 कोटी क्लबचा मास्टर आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने अवघ्या 7 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. दृश्यम 2 च्या नॉनस्टॉप कमाईचा वेग कमी होताना दिसत नाही. कलेक्शन 100 कोटींच्या पुढे अजय देवगणच्या चित्रपटाने पहिल्याच […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अजय देवगणने सिद्ध केले की तो 100 कोटी क्लबचा मास्टर आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने अवघ्या 7 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. दृश्यम 2 च्या नॉनस्टॉप कमाईचा वेग कमी होताना दिसत नाही.

हे वाचलं का?

कलेक्शन 100 कोटींच्या पुढे

अजय देवगणच्या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १०० कोटी क्लबमध्ये एंट्री घेतली आहे. अजयचा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच जबरदस्त कमाई करत आहे. चित्रपटाने शुक्रवारी 15.38 कोटी, शनिवारी 21.59 कोटी, रविवारी 27.17 कोटी, सोमवारी 11.87 कोटी, मंगळवारी 10.48 कोटी, बुधवारी 9.55 कोटींची कमाई केली. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, दृश्यम 2 ने गुरुवारी 8.70 कोटींची कमाई केली आहे. 7 दिवसांचे एकूण कलेक्शन भारतात 104.74 कोटी झाले आहे. दृश्यम 2 हा या वर्षी (2022) शतक ठोकणारा 5वा हिंदी चित्रपट ठरला आहे. एवढेच नाही तर ‘दृश्यम 2’ हा अजय देवगणच्या कारकिर्दीतील 100 कोटींचा समावेश असलेला 13वा चित्रपट ठरला आहे.

दृश्यम 2 ने तोडले हे रेकॉर्ड

अजय देवगणच्या चित्रपटाने यावर्षीचा सुपरहिट चित्रपट भूल भुलैया 2 ला मागे टाकले आहे. कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 92.05 कोटींची कमाई केली. तर दृश्यम 2 ने पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा गल्ला पार केला आहे. दृश्यम 2 भूल भुलैया 2 च्या लाइफटाईम कलेक्शनला (185.92 कोटी) मागे टाकू शकेल का, याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळणार आहे.

दृश्यम 2 ने 100 कोटींचा टप्पा सहज पार केला. पण चित्रपटासाठी पुढचा रस्ता सोपा असणार नाही. कारण वरुण धवन आणि क्रिती सेनॉनचा ‘भेडिया’ हा सिनेमाही 25 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर होणार हे निश्चित आहे. दोन्ही सिनेमांमध्ये कोण कोणावर मात करेल, हे येत्या काळात कळेल.

अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम 2’ या चित्रपटाची जबरदस्त कमाई बॉलिवूडसाठी वरदानापेक्षा कमी नाही. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू, श्रेया सरन, अक्षय खन्ना, इशिता दत्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. समीक्षक आणि चाहत्यांना आवडणारा हा चित्रपट तुम्हाला किती आवडला ते आम्हाला नक्की सांगा.

    follow whatsapp