नागपूर: कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) सुरु होऊन जवळजवळ चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, तरीही महाराष्ट्रात (Maharashtra) दररोज 10 हजारांच्या जवळपास नवे रुग्ण सापडत आहेत. त्यातच डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा एकदा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
त्यामुळेच आता नागपूरमध्ये (Nagpur) देखील पुन्हा एकदा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय नागपूर महापालिकेने घेतला आहे. कोव्हिड डेल्टा प्लस व्हेरीएंट व तिसऱ्या संभाव्य लाटेची (Third Wave) शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक स्तरावरही निर्बंध बदलण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे आदेश जारी करण्यात आले आहेत. सोमवार 28 जूनपासून शहरात नवे निर्बंध लागू होणार आहेत.
PUNE Lockdown: पुणेकरांसाठी मोठी बातमी, दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरु; सोमवारपासून काय असणार कठोर निर्बंध?
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आणि राज्यात काही ठिकाणी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध कठोर करण्यात आलेले आहे.
त्यानुसारच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर मध्ये जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नवे निर्बंध लागू केले आहे , हे निर्बंध सोमवार 28 जून ते 5 जुलै पर्यंत लागू राहणार आहे.
पाहा नागपूरमध्ये सोमवारपासून कोणते नियम लागू होणार?
सर्व दुकानं फक्त दुपारी चारवाजेपर्यंत सुरू ठेवता येणार.
मॉल्स बंद राहणार
हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार
लग्नकार्य पन्नास लोकांच्या उपस्थितीमध्येच करता येणार.
अंतयात्रेला 20 लोकांची परवानगी असणार.
जिम, सलून ,स्पा दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार
स्विमिंग पूल बंद असणार आहे.
Ajit Pawar: ‘कोल्हापूरकरांनो तोवर लॉकडाऊन शिथिल होणार नाही’, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!
नागपुरात गेल्या आठ दिवसांपासून रुग्णसंख्या कमी असली आणि मृत्यू 0 असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आणि राज्यात काही ठिकाणी आढळून आले डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण यामुळेच जिल्हा प्रशासनाने निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.
तिसऱ्या लाटेची चर्चा होते आहे. अशात सर्वात महत्त्वाचं आहे ते कोव्हिड अप्रोपिएट बिव्हेविअर. ते जर नीट आणि व्यवस्थित असेल तर कोरोनाची दुसरी लाट असो, तिसरी लाट असो किंवा दहावी लाट असो तुम्ही त्यावर मात करू शकता. योग्य ती काळजी घेतली नाही तर मात्र कोरोनाचा संसर्ग वाढणं हे क्रमप्राप्त आहे.
मास्क, सुरक्षित अंतर आणि हात सॅनेटाईझ करणं सोडू नका. आत्ता आपण दुसऱ्या लाटेच्या शेवटच्या टप्प्यातही असू पण अशावेळी ही कोव्हिड अप्रोप्रिएट बिव्हेविअर पाळणं महत्वाचं आहे. व्हायरसने कसं वागायचं त्यात काय म्युटेशन होईल हे आपल्या हातात नाही. पण आपण कसं वागायचं आणि व्हायरसला रोखायचं ते आपल्या हातात आहे.
ADVERTISEMENT