फी न भरल्याने विद्यार्थ्याला ३ तास एकटं बसवलं, डोंबिवलीतल्या ग्रीन स्कूलवर पालकांचा आरोप

मुंबई तक

• 07:08 AM • 20 Apr 2022

डोंबिवलीतील ग्रीन इंग्लिश शाळेतील इयत्ता १०वीच्या वर्गात शिकणारा चंदन गिरी या विद्यार्थ्यांला शाळेची फी न भरल्याने ३ तास एकटे बसवण्यात आले. पण माझ्या मुलाला कोंडून ठेवण्यात आलं होतं असा गंभीर आरोप पालकांनी केला. यामुळेच चंदनला चक्कर येऊन पडला असल्याचा आरोप त्याच्या पालकांकडून करण्यात आला. तसेच यासंदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाला विचारले असता विद्यार्थ्याला कोंडून ठेवण्यात आले नव्हते […]

Mumbaitak
follow google news

डोंबिवलीतील ग्रीन इंग्लिश शाळेतील इयत्ता १०वीच्या वर्गात शिकणारा चंदन गिरी या विद्यार्थ्यांला शाळेची फी न भरल्याने ३ तास एकटे बसवण्यात आले. पण माझ्या मुलाला कोंडून ठेवण्यात आलं होतं असा गंभीर आरोप पालकांनी केला. यामुळेच चंदनला चक्कर येऊन पडला असल्याचा आरोप त्याच्या पालकांकडून करण्यात आला. तसेच यासंदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाला विचारले असता विद्यार्थ्याला कोंडून ठेवण्यात आले नव्हते तर त्याला बाजूच्या वर्गात बसवण्यात आले असल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाकडून दिली. तसेच शाळेवर केलेले आरोप यावेळी व्यवस्थापनाने फेटाळले आहेत.

हे वाचलं का?

‘राज’पुत्राच्या खांद्यावर मनसेनं सोपवली मोठी जबाबदारी! अमित ठाकरे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष

काय आहे प्रकरण?

डोंबिवलीतल्या आजदे गाव या ठिकाणी मनोज गिरी यांचा १६ वर्षांचा मुलगा चंदन गिरी हा एमआयडीसी विभागातल्या ग्रीन हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्षात शिकत आहे. नववी इयत्ता पास केल्यावर त्याचे शाळेत दहावीच्या वर्गाचे क्लास सुरू आहेत. नेहमीप्रमाणे आज चंदन शाळेत गेला वर्गात सर्व मुले बसली होती. पहिला तास झाला याच दरम्यान शाळेतील शिक्षकांनी चंदन याला तू तुझ्या पालकांना बोलव असे सांगत त्याला एकट्याला एका रुममध्ये बसायला सांगितले. जवळपास तीन तास चंदन हा वर्गात एकटाच बसला होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे वडील फी कसे भरणार? या विचाराने चंदन सुन्न झाला त्यातच चंदनची तब्येत बिघडली. त्याला भोवळ आली, तो खाली पडला. शाळेने प्राथमिक उचपार करीत त्याच्या पालकांना बोलावून घेतले. वडील मनोज गिरी यांनी लगेच आपल्या मुलाला पालिकेचे शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

चंदनचे वडील मनोज यांनी लॉकडॉऊनमुळे आमची आर्थिक परिस्थिती ठिक नाही. नोकरी गेली, आम्ही फी भरु शकत नाही. मात्र पैसे हाती येताच फी भरु असे शाळेला सांगितले होते. चंदनच्या वडिलांना मागील दोन वर्षांपासून काम नसल्याने घरची आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांना अनेक अडचणी येत होत्या तसेच घरात पैसे नसल्याने घराचे लाईट बिल भरता न आल्याने महावितरणाने लाईट देखील कापली आहे. यामुळे मागील चार महिन्यांपासून घरात लाईट देखील नाही, मुलं दुसरांच्या घरात जाऊन अभ्यास करत असल्याचे चंदन गिरी याचे वडील मनोज गिरी यांच्याकडून सांगण्यात आले.

तर शाळा प्रशासनाने पालकांच्या सर्व आरोपांचे खंडन करत दोन वर्षापासून फी थकीत आहे. फी भरण्याचा तगादा विद्यार्थ्याकडे लावला नाही. त्यांच्या पालकाना फी भरण्यास सांगितले. त्याला पालकांना बोलावून घेतले होते. तोर्पयत एका वर्गात त्याला बसवून ठेवले. कोणत्याही विद्यार्थ्यांला आम्ही मानसिक त्रास दिला नसल्याचे सांगितलं. पालकांनी केलेले सगळे आरोप शाळा प्रशासनाने फेटाळले आहेत.

    follow whatsapp