इंदौर : मध्य प्रदेशात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा आज ओंकारेश्वरपासून इंदूरकडे निघाली आहे. दरम्यान, आज प्रवासात टी-ब्रेक दरम्यान धावपळ आणि धक्काबुक्की झाली झाली. यात ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह पडले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या समर्थकांनी त्यांना आधार देत वर उचलले.
ADVERTISEMENT
अनेकवेळा रस्ते लहान असल्याने यात्रेत गर्दी आणि धावपळ होते. यात अनेकदा धक्काबुक्की होते. याच धावपळीचा फटका माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना बसला. यात त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. यानंतर ते राहुल गांधींसोबत चालतानाही दिसून आले. आता यात्रा ओंकारेश्वरहून इंदूरच्या दिशेने निघाली आहे.
प्रियांका गांधी दिल्लीत परतल्या, राजस्थानमध्ये सामील होतील
आज या यात्रेत प्रियांका गांधी उपस्थित नसतील. मागील चार दिवसांपासून प्रियांका गांधी यात्रेत राहुल गांधींसोबत चालताना दिसल्या होत्या. आज मात्र त्या यात्रेत नसणार, अशी माहिती मिळते आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आज तकशी बोलताना सांगितले की, आता प्रियांका गांधी दिल्लीला परतल्या आहेत. त्या राजस्थानमधील यात्रेत सामील होणार आहेत. प्रियंका गांधी त्यांचे पती रॉबर्ट वड्रा आणि मुलासह यात्रेत सहभागी झाल्या होत्या.
स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर ट्विट केले :
दुसरीकडे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवरील टिप्पणीबाबत कमलनाथ म्हणाले की, भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजप नेते हतबल झाले आहेत. आता ते राहुल गांधींच्या बुटांबद्दल देखील बोलतील, असं कमलनाथ म्हणाले. राहुल गांधी यांनी नुकतंच ओंकारेश्वर मंदिरात प्रार्थना केली आणि नंतर आरतीला हजेरी लावली होती.
यावर इराणी यांनी टिप्पणी केली होती. एका ट्विटद्वारे त्यांनी राहुल गांधींचा आरती करतानाचा फोटो ट्विट केला आणि लिहिले, “आता ठीक आहे. ओम नमः शिवाय.” एकूणच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीका करायची एकही संधी भाजप सोडत नाही. यापूर्वी राहुल गांधी घालत असलेल्या महागड्या टी शर्टवरून भाजपकडून घेरण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT