ADVERTISEMENT
मुंबईत या वर्षातील तिसरा सर्वात मोठा रिअल इस्टेट करार झाला आहे.
बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनी 252.5 कोटींचा प्रचंड महागडा असा पेंटहाऊस खरेदी केला आहे.
मुंबईच्या मलबार हीलमधील समुद्रकिनारी असलेल्या या पेंटहाऊसचा करार हा देशातील सर्वात महागड्या करारांपैकी एक आहे.
यापूर्वी 2023 मध्ये वेलस्पन समूहाचे अध्यक्ष बीके गोयंका यांनी वरळीत श्री सिक्स्टी वेस्टमध्ये 230 कोटींचा पेंटहाऊस खरेदी केला होता.
तसंच, डीमार्टचे मालक राधाकृष्ण दमानी यांनी 1,238 कोटी रुपयांना 28 लक्झरी अपार्टमेंट्स खरेदी केले.
नीरज बजाज यांनी 13 मार्च रोजी 31 मजली लोढा मलबार पॅलेसमध्ये खरेदी केलेले ट्रिपलेक्स पेंटहाऊस 29व्या, 30व्या आणि 31व्या मजल्यावर आहे.
नीरज बजाज यांच्या या पेंटहाऊसचं एकूण क्षेत्रफळ 18,008 स्क्वेअर फूट आहे आणि त्यात 8 कार पार्किंग स्लॉट आहेत.
बजाज यांनी या रिअल इस्टेट करारासाठी 15.15 कोटी रुपयांचे स्टॅम्प ड्युटी शुल्क भरले आहे.
बजाज यांनी ज्या इमारतीत हे पेंटहाऊस विकत घेतलं आहे, त्याचे बांधकाम सध्या सुरू असून ते 2026 पर्यंत तयार होईल.
ADVERTISEMENT