ADVERTISEMENT
अंबानी कुटुंबाचा उल्लेख केला तर सगळ्यात आधी मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांची नावे येतात.
पण मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या बहिणींचा उल्लेख क्वचितच होतो. त्यांना नीना कोठारी आणि दीप्ती साळगावकर या दोन बहिणी आहेत.
नीना कोठारी या लाइमलाइटपासून दूर राहतात, पण एक यशस्वी बिझनेसवुमन म्हणून त्यांची ओळख आहे.
नीता आणि टीना अंबानी यांच्या आवडत्या नीना कोठारी सौंदर्यातही आपल्या वहिनींना टक्कर देताना दिसतात.
नीना यांचे 1986 मध्ये कोठारी एम्पायर्सचे मालक भद्रश्याम कोठारी यांच्याशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत.
कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर 2015 साली त्यांचे पती भद्रश्याम यांचे निधन झाले.
नीना कोठारी यांना नयनतारा आणि अर्जुन ही दोन मुले आहेत. 2019 मध्येच नयनताराचं लग्न अँटिलियामध्येच झालं होतं.
पतीच्या निधनानंतर नीना कोठारी यांनी त्यांच्या कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी घेतली आणि त्या पुढेही नेत आहेत.
नीना कोठारी शुगर्स अँड केमिकल्सच्या अध्यक्षा आहेत. एचसी कोठारी ग्रुपचे दक्षिण भारतात मोठे नाव आहे.
नीना आपला व्यवसाय पुढे नेत आहे. रिपोर्ट्सनुसार त्यांची संपत्ती 50 कोटींहून अधिक आहे.
ADVERTISEMENT