मनी लाँड्रिंग प्रकरण : अप्पासाहेब देशमुखांना ईडीने केली अटक, काय आहे प्रवेश प्रकरण?

मुंबई तक

• 11:01 AM • 18 Jun 2022

–इम्तियाज मुजावर, सातारा श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अप्पासाहेब देशमुख यांना ईडीने शुक्रवारी (१७ जून) अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत ईडीची कोठडी ठोठावली आहे. अप्पासाहेब देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे […]

Mumbaitak
follow google news

इम्तियाज मुजावर, सातारा

हे वाचलं का?

श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अप्पासाहेब देशमुख यांना ईडीने शुक्रवारी (१७ जून) अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत ईडीची कोठडी ठोठावली आहे. अप्पासाहेब देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी याच मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने अप्पासाहेब देशमुख यांना ईडीने अटक केली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन्ही सख्ख्या भावांना अटक केल्याने मान तालुक्यात या खळबळ उडाली आहे. मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांच्याकडून ऍडमिशनसाठी पैसे गोळ्या केल्या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप त्यांच्यावर आहे.

कोल्हापूर येथी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेश सोसायटीच्या मायणी येथील मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च या संस्थेला २०१२–१३ आणि २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी मिळाली होती. यात (१०० जागा ८५ शासकीय कोटा आणि १५ मॅनेजमेंट कोटासाठी होत्या).

केवळ २०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशांनाच परवानगी मिळालेली होती. २०१४ मध्ये मात्र, प्रवेश प्रस्ताव फेटाळून लावला होता. २०० जागांना परवानगी असताना २०१२-१३ पासून ते २०१५-१६ पर्यंत तत्कालीन अध्यक्ष महादेव देशमुख यांनी विद्यार्थ्यांची फसवणूक करून आणि बेकायदेशीरपणे पैसे गोळा करत २९ कोटी रुपये जमवले होते.

२०० जागांवरच प्रवेशाची परवानगी असताना ५५० विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करण्यात आले होते. त्यापैकी ३५० विद्यार्थ्यांना प्रवेशच मिळाला नाही. एमबीबीएस प्रवेशासाठी विद्यार्थी आणण्यासाठी महादेव देशमुख यांनी एजंट नेमले होते. त्यांना कमिशन दिलं जात होतं.

या प्रकरणात श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष महादेव देशमुख आणि इतर आरोपींविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीएमएलए म्हणजे मनी लाँड्रिंग प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    follow whatsapp