मनी लाँडरिंग प्रकरण : अनिल परबांना नोटीस देताच ED च्या तीन ठिकाणी धाडी

मुंबई तक

• 11:12 AM • 30 Aug 2021

अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या शंभर कोटी वसुलीच्या मनी लाँडरिंग प्रकरणात आता ईडीने अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. उद्या (३१ ऑगस्ट) परब यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले असून, त्यापूर्वी आज ईडीकडून तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या मालमत्तांवर धाडी टाकलेल्या असतानाच ही माहिती समोर आली आहे. भावना […]

Mumbaitak
follow google news

अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या शंभर कोटी वसुलीच्या मनी लाँडरिंग प्रकरणात आता ईडीने अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. उद्या (३१ ऑगस्ट) परब यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले असून, त्यापूर्वी आज ईडीकडून तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.

हे वाचलं का?

शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या मालमत्तांवर धाडी टाकलेल्या असतानाच ही माहिती समोर आली आहे. भावना गवळी यांच्या यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील संस्थांची झाडाझडती घेण्यात आली.

राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. अनिल परब यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर या मुद्द्यावर घमासान सुरू आहे.

दरम्यान, या चौकशी आधीच ईडीकडून मुंबईत धाडसत्र हाती घेण्यात आलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. अनिल देशमुख मनी लाँडरिंग प्रकरणात अनिल परब यांच्या संबंधाने ईडीने तीन ठिकाणी धाडी टाकल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाने दिली आहे. या धाडी नेमक्या कोणत्या ठिकाणी व कोणत्या मालमत्तांवर टाकण्यात आल्या, याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.

शिवसेनेचे तीन नेते ईडीच्या रडारवर…

शिवसेनेचे तीन नेते सध्या ईडीच्या रडारवर असल्याचं चित्र आहे. यात शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते प्रताप सरनाईक, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार भावना गवळी. प्रताप सरनाईक यांच्या मालमत्तांची ईडीकडून आधीच झाडाझडती घेण्यात आलेली आहे. तर अनिल देशमुख मनी लाँडरिंग प्रकरणात अनिल परबांचं नाव आल्यानं ईडीने परब यांच्याकडे मोर्चा वळवला आहे.

परब यांच्या चौकशीकडे लक्ष लागलेलं असतानाच आता शिवसेनेच्या खासदार भावना गवळी अडचणीत येण्याची शक्यता आहे. भावना गवळी यांच्याविरुद्ध भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर आज ईडीकडून छापेमारी करण्यात आली. तर दुसरीकडे मुंबईतही धाडी टाकण्यात आल्या आहेत.

    follow whatsapp