Medical Exam: मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, सरकारने परीक्षेबाबत केली ‘ही’ घोषणा

मुंबई तक

• 08:00 AM • 15 Apr 2021

लातूर: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत (Maharashtra University of Health Sciences) येत्या 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात […]

Mumbaitak
follow google news

लातूर: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत (Maharashtra University of Health Sciences) येत्या 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. अशी माहिती देखील अमित देशमुख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. अशावेळी परीक्षा घेणं योग्य नसल्याने आता राज्य सरकारने ही देखील परीक्षा पुढे ढकलली आहे.

‘या परीक्षा पुढे ढकलणेबाबत आपली उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे’, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

CBSE Board Exam: CBSE 10वीची परीक्षा रद्द, 12वीची परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र सरकारने 10 वी आणि 12 वी परीक्षा देखील पुढे ढकलल्या आहेत:

कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत त्यामुळे राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात येईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दोनच दिवसापूर्वीच जाहीर केलं होतं. मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. राज्य बोर्डाप्रमाणेच इतर बोर्डांनीही निर्णय घ्यावा असंही आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं होतं.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आधी शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या मुलांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आणि वाढते कोरोना रूग्ण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

परीक्षा विद्यार्थ्यांची नव्हे तर अधिकाऱ्यांची…; बोर्डाच्या परीक्षांवर सोनू सूदचं ट्विट

CBSE 10वीची परीक्षा रद्द, 12वीची परीक्षा पुढे ढकलली

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता CBSE बोर्डाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काल (14 एप्रिल) दोन अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले. हे दोन निर्णय म्हणजे CBSE बोर्डाची 10 वीची परीक्षा (CBSE 10th exam cancelled) ही रद्द करण्यात आली आहे. तर 12 वीची परीक्षा (CBSE 12th exams postponsed) पुढे ढकलण्यात आली आहे.

    follow whatsapp