Parambir Sing यांच्या अडचणी वाढल्या, ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल

मुंबई तक

• 04:33 PM • 30 Jul 2021

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. कारण त्यांच्यासह सात जणांवर FIR दाखल करण्यात आली आहे. एकूण 28 लोकांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. केतन मनसुखलाल तन्ना यांनी 54 वर्षीय व्यावसायिकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आहे. याआधीही परमबीर सिंग यांच्या विरोधात बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी केलेल्या […]

Mumbaitak
follow google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. कारण त्यांच्यासह सात जणांवर FIR दाखल करण्यात आली आहे. एकूण 28 लोकांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. केतन मनसुखलाल तन्ना यांनी 54 वर्षीय व्यावसायिकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आहे. याआधीही परमबीर सिंग यांच्या विरोधात बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी केलेल्या खंडणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

23 जुलैला झाला होता गुन्हा दाखल

परमबीर सिंग ठाणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना पराग मणेरे हे ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते. यानंतर परमबीर सिंग यांनी मुंबईत बदली झाल्यानंतर पराग मणेरे यांनाही मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत बढती देण्यात आली होती. पुनामिया आणि जैन यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी याआधीच अटक केली आहे.

शरद अग्रवाल या व्यक्तीने ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात परमबीर सिंग आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. शरद अग्रवाल हा मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेले बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल यांचा पुतण्या आहे. शरद अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्रवाल यांच्याकडून २ कोटी रुपये वसूल करत एका जमिनीच्या कागदपत्रांवर जबरदस्तीने सही करायला लावली. परमबीर सिंग ठाणे पोलीस आयुक्त म्हणून काम करत असताना त्यांच्या बंगल्यावर हा प्रकार घडल्याचं शरद अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

केतन मनसुखलाल तन्ना या 54 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. केतन तन्ना आणि त्यांच्या पत्नीला खंडणीसाठी धमकावलं जात होतं, असा आरोप तन्ना यांचे सह तक्रारदार सोनू जालान यांनी केला आहे. यामध्ये परमबीर सिंह यांच्यासोबतच माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, रवी पुजारी, एन. टी. कदम, राजकुमार कोथमिरे आणि दोन पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश असल्याचं जालान यांनी सांगितलं.

या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांसोबतच इतरही अनेकांची नावं आहेत. त्यामध्ये विमल अगरवाल, त्यांची पत्नी, त्यांचा भाऊ, जुबेर मुजावर, मनीष शाह, रितेश शाह, बच्ची सिंह, अनिल सिंह यांची नावं गुन्ह्यामध्ये आहेत. विमल अगरवाल केतन तन्ना यांना रिवॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणी मागत होता, तर त्यांची पत्नी केतन तन्ना यांच्या पत्नीला घाबरवत होती, असं देखील सोनू जालान यांनी सांगितलं आहे.

    follow whatsapp