Kolhapur crime news : कोल्हापुरात (Kolhapur) 2011 मध्ये घडलेल्या एका खूनाच्या प्रकरणात (Murder Case) जिल्हा सत्र न्यायालयाने (Kolhapur District court) 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा (life imprisonment) ठोठावली आहे. शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये विवाहित महिला आणि तिच्या प्रियकराचा समावेश आहे. शाहूवाडी पोलिसांनी (Shahuwadi Police) खूनाच्या प्रकरणात 11 आरोपींविरोधात आरोपपत्र (chargesheet) दाखल केलं होतं. पण, यातील दोन आरोपी अजूनही फरार आहेत. तर एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. (kolhapur sessions court sentenced life imprisonment to 8 accused)
ADVERTISEMENT
कोल्हापुरातील प्रकरण काय? 2011 मध्ये काय घडलं होतं?
कोल्हापुरातील लाईन बाजारमधील रहिवासी नितीन बाबासाहेब पडवळे यांची दुसरी पत्नी लीना पडवळे आणि ताराराणी चौकातील माकड वसाहतीमधील रवी रमेश माने यांच्यात अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंध समजल्यापासून पती नितीन पडवळे हा आपल्याला वारंवार मारहाण करतो आणि अनैतिक संबंधातील पतीचा हा अडथळा दूर करणं गरजेचं आहे, असं लीना पडवळे हिने प्रियकर रवी माने याला म्हणाली.
दीड लाखांची सुपारी, असा रचला खूनाचा कट
यातूनच या दोघांनी नितीन पडवळे याचा खून करण्याचा कट रचला. यासाठी दिलीप व्यंकटेश दुधाळे याला माहिती देण्यात आली. दुधाळे यानं अमित चंद्रसेन शिंदे याची भेट घेवून पडवळेच्या खूनाचा कट रचला. आणि यासाठी कट रचून दुधाळे-शिंदे या दोघांना दीड लाख रूपयांची सुपारी पडवळेच्या खुनासाठी दिली.
9 जानेवारी 2011 रोजी मध्यवर्ती एसटी बसस्थानकावरील हॉटेल महाराजा इथं रवी माने यानं एक रूम आरक्षित केली आणि आपल्या सहकार्यांसह पडवळेच्या खूनाच्या कटकारस्थानाची अंमलबजावणी करण्याचं नियोजन केलं. लीना पडवळे, तिची मैत्रिण गितांजली मेनशी हिनं मोबाईलवरून नितीन पडवळे याला आरकेनगर इथल्या खडीच्या गणपती मंदिरजवळ 12 जानेवारी 2011 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बोलवलं.
आधी मारहाण… नंतर आरोपींनी शिर केलं धडावेगळं
तिथे सर्व आरोपींनी नितीन पडवळे याला याच ठिकाणी बेसबॉल स्टिकने मारहाण करून गंभीर जखमी केले आणि भारती विद्यापीठमार्गे विशाळगड परिसरातील जंगलात नेऊन त्याचा चॉपरने निर्घुण खून केला. त्याचं शिर धडापासून वेगळं करण्यात आलं आणि धड दरीमध्ये टाकून दिलं.
या गुन्ह्याचा शाहूवाडी पोलिसांनी कसून तपास केला आणि रवी माने, लीना पडवळे यांच्यासह विजय शिंदे, किशोर माने, आकाश उर्फ अक्षय वाघमारे, दिलीप दुधाळे, अमित शिंदे, गितांजली मेनशी, इंद्रजित उर्फ चिलया बनसोडे, मनेश कुचकोरवी, सतिश वडर या 11 आरोपींच्या विरोधात नितीन पडवळे याचा खून आणि खुनातील पुरावा नष्ट केल्याबद्दल जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं.
या प्रकरणातील अमित शिंदे हा मयत झाला असून, चिल्या बनसोडे आणि सतीश वडर हे फरारी आहेत. यामुळं उर्वरित आठही आरोपींना तिसरे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी जन्मठेपेची सजा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाच्या यावतीनं ॲड. समीउल्ला पाटील यांनी काम पाहिलं. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीनं 21 साक्षीदार तपासण्यात आले.
यामध्ये सर्व साक्षीदार आणि पंच यांच्या साक्षी तसंच ॲड. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आठही आरोपींना जन्मठेप आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एस. घोगरे यांनी केला होता. खटला सुनावणीच्या कालावधीत फारूख पिरजादे यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं.
ADVERTISEMENT