Mumbai: भाजप नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेचा विनयभंग, काँग्रेस प्रचंड आक्रमक

मुंबई तक

• 11:21 AM • 23 Sep 2021

मुंबई: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता महिला सुरक्षेबाबत विशेष अधिवेशन बोलविण्यात यावं अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. ज्याबाबत राज्यपाल कोश्यारींनी देखील मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारचा सल्ला दिला. मात्र, असं असतानाच आता मुंबईतील बोरिवलीमध्ये भाजपच्याच एका महिला कार्यकर्त्याचा कार्यालयातच विनयभंग करण्यात आल्याची घटना आता समोर आली आहे. याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात कलम 354 […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता महिला सुरक्षेबाबत विशेष अधिवेशन बोलविण्यात यावं अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. ज्याबाबत राज्यपाल कोश्यारींनी देखील मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारचा सल्ला दिला. मात्र, असं असतानाच आता मुंबईतील बोरिवलीमध्ये भाजपच्याच एका महिला कार्यकर्त्याचा कार्यालयातच विनयभंग करण्यात आल्याची घटना आता समोर आली आहे.

हे वाचलं का?

याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात कलम 354 अंतर्गत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरणी आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आवाज उठवला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, भारतीय जनता पक्षाच्या बोरिवलीतील एका महिला कार्यकर्त्याला भाजपचे ब्लॉक अध्यक्ष प्रतिक साळवी याने भाजप नगरसेविका अंजली खेडकर यांच्या कार्यालयात बोलावलं आणि नंतर ऑफिस बंद करुन छेडछाड केली. असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. 15 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती.

दरम्यान, याप्रकरणी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी असं म्हटलं आहे की, पीडित महिलेने याप्रकरणी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडे तक्रार देखील केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. याचप्रकरणी सचिन सावंत हे प्रचंड आक्रमक झाले अशून त्यांनी आता भाजपवर जोरदार टीका सुरु केली आहे.

सचिन सावंत यांनी नेमकं काय म्हटलंय?

‘भाजपच्या महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. आत्ता बोरिवली पोलीस ठाण्यात भाजपा नगरसेविका कार्यालयात महिलेचा भाजपा कार्यकर्त्याने विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दुर्दैव म्हणजे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि सुनील राणे यांच्याकडे तक्रार करून न्याय मिळाला नाही.’

‘फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादांनी महिलेचा आवाज दाबला. त्या भाजपा नेत्यांवर काय कारवाई करणार हे स्पष्ट करावे. संपूर्ण भाजप अत्याचार झालेल्या महिलेच्या विरोधात उभी आहे. अत्याचार करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जाहीर निषेध’

‘भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाला व महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचा आवाज दाबण्यासाठी तीला भाजपा नगरसेविकांनी मारहाण केली. हे भाजपचे महिला विरोधी रुप आहे.’ असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

प्रविण दरेकर यांच्याविरोधात पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

महापौर किशोर पेडणेकरांचा विनयभंग प्रकरणावरुन चित्रा वाघ यांना खडा सवाल

भाजपच्या महिला आता गप्प का? भाजप नेहमीच महाराष्ट्राला बदमान करण्याचा प्रयत्न करत आहे. खोटं रडून दाखवता, आता ताईगिरी कुठे गेली? असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर हल्ला चढवला आहे.

मुंबईतील भाजपा कार्यालयात बोलावून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या वॉर्ड अध्यक्षास तातडीने अटक करावी, तसेच महिलेस मारहाण करणाऱ्या भाजपा महिला पदाधिकाऱ्यांस अटक करावी ह्या मागणीसाठी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पोलीस उपायुक्त, परिमंडळ 11 यांची भेट घेणार आहेत. अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली आहे.

    follow whatsapp