MiG-21 Crash: लढाऊ विमान मिग-21 क्रॅश, पायलट अभिनव शहीद; नुकतंच झालं होत लग्न

मुंबई तक

• 08:59 AM • 21 May 2021

अमृतसर: पंजाबमधील मोगा येथे काल रात्री 1 वाजेच्या सुमारास फायटर जेट मिग-21 क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणादरम्यान पायलट अभिनवने राजस्थानच्या सूरतगडहून मिग-21 येथून उड्डाण घेतलं होतं. ज्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळलं. या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. ज्यामध्ये हे विमान पूर्णपणे जळून खाक झालं. दरम्यान, आज (शुक्रवार) सकाळी पायलट अभिनवचा […]

Mumbaitak
follow google news

अमृतसर: पंजाबमधील मोगा येथे काल रात्री 1 वाजेच्या सुमारास फायटर जेट मिग-21 क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणादरम्यान पायलट अभिनवने राजस्थानच्या सूरतगडहून मिग-21 येथून उड्डाण घेतलं होतं. ज्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळलं. या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. ज्यामध्ये हे विमान पूर्णपणे जळून खाक झालं. दरम्यान, आज (शुक्रवार) सकाळी पायलट अभिनवचा मृतदेह हाती लागला. दरम्यान, या संपूर्ण अपघाताची चौकशी करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, लढाऊ विमान मिग-21 मोगामधील बाघापुराना या गावी लंगियाना खुर्दजवळ रात्री 1 वाजण्याच्या सुमारास कोसळलं. ज्यानंतर तात्काळ प्रशासन व सैन्याचे उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. अनेक प्रयत्नानंतर पायलट अभिनव यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं होतं. त्यांच्या मृत्यूवर हवाई दलाकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

मूळच्या बागपत मधील असणाऱ्या पायलट अभिनव चौधरीचं लग्न 25 डिसेंबर 2019 रोजी मेरठमध्ये झालं होतं. फायटर पायलट आणि शेतकऱ्याच्या या मुलाने आपल्या लग्नात हुंडा घेण्यास नकार देऊन एक नवा आदर्श घालून दिला होता. साधारण दीड वर्षापूर्वीच लग्ना झालेल्या अभिनव काल झालेल्या अपघातात शहीद झाल्याने बागपतमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

खरं तर एकेकाळी फायटर जेट मिग 21 विमान भारतीय हवाई दलाचा कणा मानला जात असे. पण आता याचे अवघे चार स्क्वॉड्रन (पथके) शिल्लक आहेत. या विमानाची सतत काळजी घेतली जात आहे. तसेच त्यांची श्रेणी देखील सुधारित गेली असेल, पण आता ही विमानं युद्ध किंवा उड्डाणायोग्य नाहीत.

एअर अँब्यूलन्सचा अपघात टळला, मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडींग

जेव्हा बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला होता तेव्हा याच मिग-21 बायसन विमानांनी पाकिस्तानी लढाऊ विमानांचा पाठलाग करत त्यांना सळो की पळो करुन सोडलं होतं. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचं विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं होतं. त्यावेळी भारताने कूटनितीचा वापर करुन अवघ्या काही तासात लढवय्या अधिकाऱ्याला पुन्हा भारतात आणलं होतं.

मुंबई विमानतळावर कोरोना प्रतिबंधाचे नियम न पाळल्यास भरावा लागणार भरमसाठ दंड

दरम्यान, सतत मिग-21 विमानांचे अपघात होत असल्याने बर्‍याच वैमानिकांनी आपला जीव गमवला आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर ही विमान हवाई दलातून रिटायर करण्याची वेळ आली आहे. 1960 पासून हवाई दलाकडून मिग-21 विमानांचा वापर सुरु आहे. हवाई दलाकडून सातत्याने सांगण्यात येत आहे की, ही विमाने कितीही जुनी असली तरीही ती युद्धांसाठी कायम सज्ज ठेवण्यात येत आहेत.

    follow whatsapp