नागपूर: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा चुलत पुतण्या तन्मय फडणवीस (Tanmay Fadnavis) याने नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्सस्टि्यूटमध्ये (National Cancer Institute) कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर आता याप्रकरणी विरोधकांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. पण यावरुन आता एक नवी माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
तन्मय फडणवीस याने ज्या नॅशनल कॅन्सर इन्सस्टि्यूटमध्ये लस घेतली त्याच इन्सस्टि्यूटमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी सुरु करण्यात आलेल्या हॉस्पिटलचं उद्घाटन हे अवघ्या 5 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं होतं. त्यामुळे आता या संपूर्ण घटनेविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. जाणून घेऊयात याविषयी सविस्तरपणे.
देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने कोरोनाची लस घेतल्याचं सगळ्यात आधी राज्यातील काँग्रेसने समोर आणलं. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर तन्मय फडणवीस याने कोरोना लस घेतल्याचे फोटो शेअर करत काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले होते. 45 वर्ष पूर्ण नसलेल्या तन्मयला लस कशी मिळाली असा सवाल त्यांनी उपस्थित करण्यात आला आहे.
ज्याच्यावरुन देवेंद्र फडणवीसांवर होतेय टीका तो तन्मय फडणवीस नेमका आहे तरी कोण?
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये पाच दिवसांपूर्वीच फडणवीसांच्या हस्ते झालं होतं उद्घाटन
दरम्यान, आता याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. तन्मयने ज्या नॅशनल कॅन्सर इन्सस्टि्यूटमध्ये लस घेतली त्याच इन्सस्टि्यूटमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी 100 बेडचं एक रुग्णालय पाचच दिवसांपूर्वी (15 एप्रिल) सुरु करण्यात आलं आहे. ज्याचं उद्घाटन स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.
याच उद्घाटनाचे फोटो त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर देखील शेअर केले होते. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, ‘नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्सस्टि्यूट येथे 100 बेडचं कोव्हिड-19 केअर हॉस्पिटलचं उद्घाटन माझ्या आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. येत्या काही दिवसातच इथे 200 बेडस उपलब्ध होतील.’
एकीकडे काँग्रेसने असा सवाल उपस्थित केला आहे की, ‘फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?’ तर दुसरीकडे याच इन्सस्टि्यूटचं उद्घाटन स्वत: फडणवीसांनी केल्याचं समोर आल्याने आता याप्रकरणी विरोधक नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तन्मयला लस कशी काय मिळाली?, ‘या’ प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांच्या भावाची प्रतिक्रिया
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे CEO शैलेश जोगळेकर ‘नॉट रिचेबल’
दरम्यान, नागपूरमधील राजकीय वर्तुळात अशीही चर्चा सुरु आहे की, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे असलेले शैलेश जोगळेकर हे संचालक मंडळावर आहेत. त्यामुळे तर ही लस तन्मय फडणवीस यांना सहज मिळाली नसेल ना?
त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणावर ‘मुंबई तक’ने नागपूरच्या नॅशनल कँसर इन्स्टिट्यूटचे CEO शैलेश जोगळेकर यांच्यासोबत वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो होऊ शकला नाही.
नेमकं प्रकरण काय?
देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने लसीकरण करतानाचा एक फोटो त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना नेटकऱ्यांनी आणि काँग्रेस पक्षाने ट्विटर, फेसबुकवर चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात केली. माजी मुख्यमंत्री यांच्या पुतण्याला जर सगळे नियम शिथील आहेत. मग नागपूर कॅन्सर इन्सस्टि्यूटने 18 वर्षांवरील सगळ्यांचे लसीकरण करावे अशी मागणी होऊ लागली.
या संपूर्ण प्रकरणानंतर तन्मय फडणवीसने त्याचे फोटो सोशल मीडियावरून डिलिट केले. मिळालेल्या माहितीनुसार तन्मय फडणवीस याचं वय हे अंदाजे 22 ते 25 वर्षाच्या दरम्यान आहे. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सध्या देशात 45 वर्षे आणि त्यापुढील नागरिकांना लस देण्यात येते आहे. अशात तन्मय फडणवीस यांनी लस कशी घेतली हा प्रश्न विचारला जातो आहे. (five days ago fadnavis had inaugurated the same hospital where Tanmay had taken the corona vaccine)
ADVERTISEMENT