संजय राऊत यांनी सॉसची टेस्ट घेऊन पाहिली का?-गिरीश महाजन

मुंबई तक

27 Apr 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:50 AM)

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक भाजप नेते किरीट सोमय्या यांना झालेली जखम किती सेंटीमीटरची होती? हा विषय नाही. ज्या पद्धतीने त्यांच्या गाडीवर हल्ला झाला, ज्या पद्धतीने दगडफेक झाली, हे निषेधार्ह आहे. सीसीटीव्हीत हल्ला झाल्याचे दिसते आहे. पोलिसांत तक्रार घेतली जात नसल्याचे राज्याचे दुर्दैव असल्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हणत महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी […]

Mumbaitak
follow google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

हे वाचलं का?

भाजप नेते किरीट सोमय्या यांना झालेली जखम किती सेंटीमीटरची होती? हा विषय नाही. ज्या पद्धतीने त्यांच्या गाडीवर हल्ला झाला, ज्या पद्धतीने दगडफेक झाली, हे निषेधार्ह आहे. सीसीटीव्हीत हल्ला झाल्याचे दिसते आहे. पोलिसांत तक्रार घेतली जात नसल्याचे राज्याचे दुर्दैव असल्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हणत महाविकास आघाडीवर टीका केली.

यावेळी ते म्हणाले की, हल्ला झाल्याचा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. पोलीस ठाण्यात सोमय्यांची तक्रार दाखल करून घेतली जात नाही. म्हणून सोमय्या दाद मागण्यासाठी राज्यपालांना भेटायला गेले असल्याचे ते म्हणाले. आमचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्याचे कॅमेऱ्यात दिसते आहे. तरीदेखील तोंडाला जखम नसून सॉस लागले आहे असे संजय राऊत म्हणतात. संजय राऊत यांनी काय सॉसची चव घेऊन पाहिली का? असा खोचक प्रश्न गिरीश महाजन यांनी विचारला आहे. तसंच खोटं बोल पण रेटून बोल असे शिवसेनेकडून सध्या राज्यात सुरु आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

‘कोणी एखादा माथेफिरु, वेडा स्वत:वर हल्ला झाला हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टॉमेटो सॉस लावून फिरत असेल आणि सॉस लावून राष्ट्रपती राजवट लावा असं सांगत असेल तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.’ अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचं नाव न घेता बोचरी टीका केली.

राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काही शिवसैनिकांनी दगडफेक केली होती. यावेळी शिवसैनिकांकडून आपल्या हत्येचा प्रयत्न केला गेला असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या हल्ल्यानंतर सोमय्या यांच्या हनुवटीमधून रक्त येत असल्याचं काही फोटोंमधून दिसतं होतं. मात्र, सोमय्यांची ही जखम खोटी असल्याचा दावा शिवसेनेने केला होता. दरम्यान, आता याचबाबत भाभा रुग्णालयाचा एक रिपोर्ट समोर आल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.

अहवालात काय म्हटलं आहे?

-सोमय्यांच्या चेहऱ्यावर 0.1 CM चा कट आहे

-चेहऱ्यावर कोणतीही सूज नाही

-कटमधून रक्तस्त्राव झाला नाही

-कोणतीही मोठी दुखापत झाली नाही

    follow whatsapp