ठाण्यात Corona च्या Delta Plus चे चार रूग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा झाली सतर्क

मुंबई तक

• 12:37 PM • 09 Aug 2021

नाशिकमध्ये डेल्टाचे रूग्ण आढळले असल्याची बातमी समोर आलेली असतानाच आता ठाण्यात डेल्टा प्लसचे चार रूग्ण आढळले आहेत. नाशिकनंतर ठाण्यात डेल्टा प्लस व्हायरसचे रूग्ण वाढल्याने चिंताही वाढली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यात ठाणे महापालिकेला यश आलं. त्यात आता चार रूग्ण डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आढळून आल्याने चिंता वाटू लागली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात तीन तर नवी मुंबई […]

Mumbaitak
follow google news

नाशिकमध्ये डेल्टाचे रूग्ण आढळले असल्याची बातमी समोर आलेली असतानाच आता ठाण्यात डेल्टा प्लसचे चार रूग्ण आढळले आहेत. नाशिकनंतर ठाण्यात डेल्टा प्लस व्हायरसचे रूग्ण वाढल्याने चिंताही वाढली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यात ठाणे महापालिकेला यश आलं. त्यात आता चार रूग्ण डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आढळून आल्याने चिंता वाटू लागली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात तीन तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एक रूग्ण आढळून आला आहे.

हे वाचलं का?

25 वर्षांखालील 2 जण तर 56 वर्षा खालील 2 जण बाधित झाले असून या मध्ये दोन महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी दिली. रुग्णांवर उपचार करून पाठवण्यात आले असले तर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात असल्याचे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता ठाणे जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सोशल डिस्टन्स आणि इतर आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंट नेमका काय आहे?

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये आणखी बदल होऊन म्हणजेच म्युटेशन होऊन डेल्टा प्लस हा व्हेरिएंट तयार झाला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये डेल्टा व्हेरिएंटमधे असलेले सगळे म्युटेशन आहेत. तसंच या व्हेरिएंटमध्ये K417N हे म्युटेशनही आढळलं आहे. भारतात सगळ्यात आधी आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटचं शास्त्रीय नाव B.1.617.2 असं आहे. तर आता म्युटेट झालेल्या म्हणजेच बदल झालेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचं नाव हे B.1.617.2.1 असं आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिलेली माहिती अशी ‘कोरोना संसर्गाची दसरी लाट अधिक झपाट्याने पसरण्यासाठी डेल्टा व्हेरिएंट कारणीभूत होता. यात आणखी एक म्युटेशन झालं आहे. याला डेल्टा प्लस असं नाव देण्यात आलं आहे.’

Variant Of Concern म्हणजे नेमकं काय?

जेव्हा कोणताही व्हायरस हा जास्त प्रमाणात रोग प्रसार वाढवणारा असतो किंवा जास्त प्रमाणात साथ रोगामुळे मृत्यू वाढवणारा असतो तेव्हा त्याला Variant Of Concern असं जाहीर केलं जातं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात आणि महाराष्ट्रात हाहाकार माजवला. कोरोनाची दुसरी लाट देशातून आणि राज्यातून ओसरत असतानाच आता समोर धोका आहे तो डेल्टा प्लसचा. त्याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असं जाहीर करण्यात आलं आहे. म्हणजेच काळजी वाढवणारा व्हेरिएंट किंवा व्हायरसचा प्रकार असं त्याला जाहीर करण्यात आलं आहे. कोरोनाचा विषाणू रूप बदलू लागला आहे. जगभरात कोरोनाच्या व्हायरसचे वेगवेगळे व्हेरिएंट आहेत. त्या व्हेरिएंटना WHO ने नावंही दिली आहेत. अशावेळी आता डेल्टा प्लस हा व्हेरिएंट काळजी वाढवणारा व्हेरिएंट म्हणून जाहीर झाला आहे.

    follow whatsapp