सरासरी फेब्रुवारी महिन्यात वाशीच्या एपीएमसी बाजारात कोकणचा राजा असलेल्या कोकणातील हापूस आंब्याची आवक होण्यास सुरुवात होत असते. मात्र यंदा डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात देवगडचा हापूस आंबा वाशीच्या एपीएमसी बाजारात दाखल झाला आहे.
ADVERTISEMENT
त्यामुळे आता हापूसचा गोडवा चाखण्यासाठी ग्राहकांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही बाजारात हापूसच्या तीन पेट्या दाखल झाल्या आहेत. एका पेटीला 2 ते 5 हजार दर अपेक्षीत आहे असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
दरवर्षी एपीएमसी बाजारात फेब्रुवारी महिन्यात हापूस आंब्याच्या आवक येण्यास सुरुवात होते. त्यानंतर मार्च ,एप्रिल आणि मे महिन्यात आवक वाढून मुख्य हंगाम जोर पकडतो. साधारण पावणेदोन वर्षांपूर्वी हापूस हंगामाला सुरूवात होताच आणि मुख्य हंगामाला सुरवात कोरोना आजाराने थैमान घातले. त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाला. लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने तुरळक आवक झाल्याने हापूसचा मोठा हंगाम वाया गेला आणि शेतकऱ्यांना मोठया नुकसानीला सामोरे जावे लागले.
यंदा अवकाळी पाऊस आल्याने जवळपास 80 टक्के मोहोर गळून पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सध्या हापूसच्या मुख्य हंगामाला जरी सुरुवात झाली तरीही हापूस दाखल झाला आहे. अरविंद वाळके ,वाळकेवाडी देवगड येथून हापुस च्या तीन पेट्या वाशितील एपीएमसी बाजारात दाखल झाल्याने कोकणातील ही पहिली खेप आहे. या आंब्याला सरासरी 2 ते 5 हजार दर अपेक्षीत आहे असे मत फळ मार्केट मधील व्यापारी आणि संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.
ADVERTISEMENT