ADVERTISEMENT
काहीजण फळे फ्रीजमध्ये ठेवतात. पण काहीवेळेस ती बाहेर ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकत नाहीत.
एक अशी पद्धत आहे ज्यामुळे फळे दीर्घकाळ बाहेर ठेऊनही ताजे राहतात. चला जाणून घेऊयात.
द्राक्षे घडातून तोडून कधीही ठेवू नका. त्यांना नेहमी थंड ठिकाणी ठेवा.
जर, फ्रीज नसेल तर संत्री थंड ठिकाणी ठेवा किंवा संत्री थेट हवेच्या संपर्कात आल्यास त्यावर पाणी शिंपडत रहा, अन्यथा ते सुकण्यास सुरवात होईल.
पपई हे फळ पेपरमध्ये गुंडाळून आणि सामान्य तापमानात साठवून दीर्घकाळ ताजे ठेवू शकतो.
पपई कापली असल्यास फॉइल पेपरमध्ये गुंडाळल्यास किंवा प्लास्टिकने झाकल्यास ते लवकर खराब होणार नाही.
सफरचंद सामान्य तापमानात पेपरमध्ये गुंडाळून ठेवल्यास दीर्घकाळ ताजे राहतात.
ADVERTISEMENT