‘हा उद्धवच्या गळ्यातला ताईत होता’, गजानन कीर्तीकरांनी संजय निरुपमांचा सगळा इतिहासच सांगितला

मुंबई तक

• 05:47 AM • 16 Nov 2022

शिवसेनेतल्या बंडखोरी नंतर राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतरही गजानन कीर्तीकर उद्धव ठाकरेंच्या गटात होते. मात्र, गेल्या आठवड्यात गजानन कीर्तीकरांनी शिंदे गटात उडी मारली. त्यावरून त्यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम आक्रमक झालेत. संजय निरुपमांनी थेट गजानन कीर्तीकरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केलीये. राजीनामा मागणाऱ्या निरुपमच्या मागणीवर मौन सोडत कीर्तीकरांनी सगळा इतिहासच सांगून टाकला. खासदार […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेतल्या बंडखोरी नंतर राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतरही गजानन कीर्तीकर उद्धव ठाकरेंच्या गटात होते. मात्र, गेल्या आठवड्यात गजानन कीर्तीकरांनी शिंदे गटात उडी मारली. त्यावरून त्यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम आक्रमक झालेत. संजय निरुपमांनी थेट गजानन कीर्तीकरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केलीये. राजीनामा मागणाऱ्या निरुपमच्या मागणीवर मौन सोडत कीर्तीकरांनी सगळा इतिहासच सांगून टाकला.

हे वाचलं का?

खासदार गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवेसना पक्षात प्रवेश केला. गजानन कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचा हात धरल्यानं काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी थेट त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याचीच मागणी केली.

गजानन किर्तीकरांचा राजीनामा घेणारच! तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही : संजय निरुपम मैदानात

गजानन कीर्तीकरांनी शिंदे गटात प्रवेश करून मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातील मतदारांना धोका दिल्याचं संजय निरुपम यांचं म्हणणं आहे. संजय निरुपम यांनी गजानन कीर्तीकरांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. याच मुद्द्यावर बोलताना गजानन कीर्तीकरांनी निरुपम यांना आव्हान दिलंय.

संजय निरुपम यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर गजानन कीर्तीकर काय म्हणाले?

पुण्यात माध्यमांशी बोलताना खासदार गजानन कीर्तीकर म्हणाले, “त्या संजय निरुपमला २०१९ मध्ये पावणे तीन लाख मतांनी हरवलं. हा संजय निरुपम उद्धवच्या एकदम जवळचा माणूस. त्याच्या गळ्यातला ताईत. सातत्यानं त्याने दोन वेळा राज्यसभा घेतली. का घेतली, तर दिल्ली लॉबी आणि तिथल्या वृत्तपत्रात शिवसेनेला सांभाळणार म्हणून… पण याचे तिकडे व्यावसायिक धंदे सुरू झाले.”

पुढे बोलताना कीर्तीकर म्हणाले, “अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्याने एव्हढा मोठा घपला केला. त्याच्या पदाचा गैरवापर केला. त्याची तक्रार बाळासाहेबांकडे गेली होती. बाळासाहेबांनी त्याला जाब विचारला. पण, हा थांबला नाही, राजीनामा देऊन बाहेर पडला आणि काँग्रेसमध्ये गेला. असा हा संजय निरुपम.”

Sanjay Raut: “गजानन किर्तीकर यांना पक्षाने काय दिलं नाही? उद्या त्यांना लोक विसरतील”

“त्याला (संजय निरुपम) मी हरवलं. आता त्याच्या सांगण्यावरून मी राजीनामा नाही देणार. राजीनामा देईन जरूर. त्याने परत २०२४ मध्ये माझ्याविरोधात निवडणूक लढवावी. त्याला पावणे तीन नाही, तर पावणे चार लाख मतांनी हरवणार आणि जिंकून आल्यानंतर मी राजीनामा देणार”, असं म्हणत गजानन कीर्तीकरांनी निरुपम यांना २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलंय.

    follow whatsapp