Ganesh Chaturthi 2022: १० वर्षांनी जुळून आला ‘हा’ योग, अशी करा बाप्पाची पूजा

मुंबई तक

• 02:15 AM • 31 Aug 2022

यावर्षी गणेश चतुर्थी ३१ ऑगस्टला म्हणजेच आज आहे. या दिवशी विविध सार्वजनिक मंडळं आणि घरोघरी बाप्पा विराजमान होतील. ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे या दिवसापर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या वर्षीच्या गणेश चतुर्थीला एक खास योग जुळून आला आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत याच योगाबद्दल. ज्योतिषी श्रीपती त्रिपाठी यांनी योगाबाबत […]

Mumbaitak
follow google news

यावर्षी गणेश चतुर्थी ३१ ऑगस्टला म्हणजेच आज आहे. या दिवशी विविध सार्वजनिक मंडळं आणि घरोघरी बाप्पा विराजमान होतील. ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे या दिवसापर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या वर्षीच्या गणेश चतुर्थीला एक खास योग जुळून आला आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत याच योगाबद्दल.

हे वाचलं का?

ज्योतिषी श्रीपती त्रिपाठी यांनी योगाबाबत काय सांगितलं आहे?

गणेश चतुर्थी यंदा ३१ ऑगस्टला येते आहे. या दिवशी बुधवार आहे. या दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरी करावी. अशात एक दुर्लभ योग यादिवशी तब्बल १० वर्षांनी जुळून आला आहे. गणेश पुराणात दिलेल्या माहितीनुसार गणपती बाप्पाचा जन्म बुधवारी झाला होता. त्यामुळे यावर्षीही गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवार आला आहे. याआधी हा योग २०१२ मध्ये आला आहे. गणेश चतुर्थी आणि बुधवार एकाच दिवशी आले होते. तसाच योग आता १० वर्षांनी जुळून आला आहे.

श्रीपती त्रिपाठी यांनी सांगितलं की ग्रहांच्या खास योगांमुळे हा योग दहा वर्षांपूर्वीही जुळून आला होता. गणेश पुराणात दिलेल्या माहितीनुसार गणपती बाप्पाचा जन्म भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला सकाळच्या वेळात झाला होता. त्या दिवशी बुधवार होता. या वर्षीही हा योग जुळून आला आहे.

३१ ऑगस्टला उदिया कालीन चतुर्थी आणि मध्यान्ह व्यापिनी चतुर्थी आहे. त्यामुळे यादिवशी गणेश पूजन करणं हे भक्तांसाठी खास असणार आहे. कल्याणकारी आणि आशीर्वाद देणारं असणार आहे. गणेश पूजा केल्यानंतर तुमच्या एखाद्या कामात जर विघ्न येत असेल तर ते दूर होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी रवि योग आहे असाच योग १० वर्षांपूर्वीही जुळून आला होता.

गणेश पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त

अमृत योग- सकाळी ७ वाजून ५ मिनिटं ते ८ वाजून ४० मिनिटं

शुभ योग सकाळी १० वाजून १५ मिनिटं ते ११ वाजून ५० मिनिटं

गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी बसवण्यात आलेल्या मूर्तीला काय अर्पण कराल?

गणेश चतुर्थीला घरी बसवण्यात आलेल्या बाप्पाच्या मूर्तीला दुर्वा वाहिला जातात. २१ दुर्वांची एक जुडी असते. अशा २१ जुड्यांची माळ गणपतीला घालण्याची प्रथा आहे. मोदक हे गणपतीला प्रिय आहेत. त्यामुळे या दिवशी मोदकांचा नैविद्य दाखवावा. याच दिवशी बाप्पाला शेंदूरही वाहिला जातो. तसंच पूजा करणाऱ्या प्रत्येकाने शेंदूर कपाळाला लावण्याचीही प्रथा आहे.

गणेश चतुर्थीचं महत्त्व काय आहे?

पौराणिक कथेनुसार, भगवान गणेशाची निर्मिती माता पार्वतीने चंदनाच्या लेपापासून केली होती. शक्तीची देवता असल्याने माता पार्वतीने श्री गणेशाला एवढे सामर्थ्य आणि शक्ती दिली की अनेक मोठ्या देवांनाही युद्धात गणेशाचा सामना करता आला नाही. अखेर भगवान शिवप्रभूंनी नकळतपणे श्री गणेशाचा शिरच्छेद केला.

माता पार्वतीला याबाबत समजलं तेव्हा त्यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी गणेशाला पुन्हा जिवंत करण्याची मागणी केली. त्यानंतर शिवप्रभूंनी हत्तीचं डोकं गणेशाच्या धडावर ठेवले आणि त्यामुळे गजमुखी श्रीगणेशाची निर्मिती झाली. गणेश चतुर्थीच्या या शुभ दिवशी भगवान शिवप्रभूंनी कोणत्याही देवाच्या पूजेआधी श्री गणेशाची पूजा केली जाईल असा आशीर्वाद दिला. त्यामुळे कोणत्याही देवाच्या आधी श्री गणेशाची पूजा केली जाते. ज्ञान आणि शक्तीचे प्रतीक म्हणून नेहमी श्री गणेशाची पूजा केली जाते.

    follow whatsapp