विक्रांत चव्हाण
ADVERTISEMENT
ठाणे: कोरोना (Corona) संदर्भातील 8 ते 12 तास काम करायचे आणि फक्त 35 रुपये मानधन. हो हे मानधन आहे आशा वर्कर्सचे… (Asha Worker) कोरोनाला रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबादारी’ ही मोहीम सफल करण्यात सर्वात मोठा वाटा होता तो आशा वर्कर्सचा. असे असताना मात्र यांच्या ‘आशा’ पूर्ण करण्यास सरकार अपयशस्वी ठरत आहे. नेमक्या काय आहेत त्यांच्या अडचणी, का आली त्यांच्यावर संप पुकारण्याची यावरचा हा ग्राउंड रिपोर्ट.
कोरोनामुळे सर्व जगातील व्यवहार हे जवळजवळ ठप्प झाले आहेत. कोरोनाची पहिली लाट त्यानंतर दुसरी लाट आणि त्याचे दुष्परिणाम यामध्ये सर्वच लोक त्रस्त झाले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारबरोबर डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी खांद्याला खांदा लावत प्रयत्न करत आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली आणि ही योजना सफल ही झाली.
त्याचे मुख्य कारण म्हणजे आशा वर्कर्स यांचे कष्ट ,त्यांची मेहनत. गावोगावी जाऊन या आशा वर्कर्सने लोकांचे पल्स, ऑक्सिमेटर, तपासणं आणि त्यांच्या आरोग्याच्या वेगवेगळ्या नोंदी करण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे. एका आशा वर्करला किमान 50 घरं रोज करावी लागतात.
याशिवाय आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरणापासून रुग्ण तपासणीत मदत करावी लागते. शिवाय आरोग्य विभागाचे डॉक्टर सोपवतील ती कामे करावी लागतात. साधारणपणे 8 ते 12 तास काम करून घेतले जाते. त्याबद्दल महिन्याकाठी त्यांना मिळतात फक्त 1000 रुपये. म्हणजे रोजचे साधारण 35 रुपये दिले जातात.
ADVERTISEMENT