गळ्याभोवती विषारी कोब्रा नागाचा विळखा असतानाही दोन तास जमिनीवर निपचीत पडून राहिलेल्या वर्ध्याच्या परी गडकरी या लहानग्या मुलीचा जीवनाशी संघर्ष सुरुच आहे. शनिवारी आपल्या घरी मध्यरात्री अकरा ते बाराच्या दरम्यान गाढ झोपली असता अचानक विषारी कोब्रा नागाने तिच्या गळ्याला वेढा घातला आणि फणा काढून डोलू लागला. या मुलीला जाग आली ती किंचाळल्याने शेजारी असलेल्या आई-बाबांना जाग आली.
ADVERTISEMENT
मुलीच्या गळ्याभोवत असलेल्या सापाला बाजूला काढण्याच्या प्रयत्नात अखेरीस तिला सर्पदंश झालाच. सध्या परीवर वर्ध्यातील रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती अजुनही चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
मुलीच्या हातावर सापाने दंश केल्यामुळे तिच्यावर वर्ध्याच्या सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहे. मुलीच्या हातावर सापाने दंश केल्यानंतर इन्फेक्शन कमी करण्यात डॉक्टरांना यश आलंय. परंतू तिच्या शरिरात टोकंझिन मेटापॉलिक्स तयार होत आहेत जे तिच्यासाठी धोकादायक ठरु शकतात. सोमवारी चार वाजता तिच्या हातावर डॉक्टर ऑपरेशन करणार आहेत. एक बाजू डॉक्टरांनी कव्हर केलेली असली तरीही तिच्या दुसऱ्या हाताला झालेलं इन्फेक्शन अद्याप कमी होत नाहीये.
हे इन्फेक्शन जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत परीचा धोका कमी झालाय असं म्हणता येणार नाही. त्यामुळे परीचे दोन्ही हात जोपर्यंत बरे होत नाही तोपर्यंत तिच्यावरचा धोका कायम असणार आहे. आपल्या मुलीने इतकं सर्व काही सहन केलं आहे, त्यामुळे देवाला हात जोडून प्रार्थना आहे की ती आता बरी व्हावी अशी प्रतिक्रीया आईने व्यक्त केली आहे. वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी रुग्णालयात परीच्या कुटुंबाची भेट घेऊन सर्वतोपरीने मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
ADVERTISEMENT