गोकुळ दूधसंघात सत्तांतर, महाडीक गटाला धक्का देत सतेज पाटलांची बाजी

मुंबई तक

• 05:06 PM • 04 May 2021

कोल्हापूर आणि पर्यायाने राज्याच्या सहाकार क्षेत्रात महत्वाचं स्थान असलेल्या गोकुळ दूध संघाची मतमोजणी आज पार पडली. या निवडणूकीत सत्तेवर असलेल्या महाडीक गटाला धक्का देण्यात विरोधी पक्षाची आघाडी यशस्वी ठरली आहे. संचालकांच्या २१ जागांसाठी पार पडलेल्या मतमोजणीत सत्ताधारी गटाला ४ तर विरोधी पक्षातल्या आघाडीने १७ जागा मिळवत गोकुळमध्ये सत्तांतर घडवून आणलं आहे. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या गोकुळ […]

Mumbaitak
follow google news

कोल्हापूर आणि पर्यायाने राज्याच्या सहाकार क्षेत्रात महत्वाचं स्थान असलेल्या गोकुळ दूध संघाची मतमोजणी आज पार पडली. या निवडणूकीत सत्तेवर असलेल्या महाडीक गटाला धक्का देण्यात विरोधी पक्षाची आघाडी यशस्वी ठरली आहे. संचालकांच्या २१ जागांसाठी पार पडलेल्या मतमोजणीत सत्ताधारी गटाला ४ तर विरोधी पक्षातल्या आघाडीने १७ जागा मिळवत गोकुळमध्ये सत्तांतर घडवून आणलं आहे.

हे वाचलं का?

कोट्यवधींची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाचं कोल्हापुरात महत्व आहे. अनेक राजकीय पुढारी आमदारकी नको पण गोकुळमध्ये पद मिळावं यासाठी उत्सूक असतात. गेल्या हंगामात माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या गटाचं गोकुळवर वर्चस्व होतं. यंदाच्या निवडणुकीसाठीही महादेवराव महाडीक, माजी खासदार धनंजय महाडीक, विद्यामान आमदार प्रकाश आवाडे, पी.एन.पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी एकत्र येऊन आघाडी तयार केली होती. याविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील ३ मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपली आघाडी तयार केली.

३ हजार ६४७ सभासदांपैकी ३ हजार ६३९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. ज्यानंतर रात्री ९ वाजता निकाल घोषित करण्यात आला. ज्यात मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने सत्तांतर घडवून आणत महाडीक गटाला धक्का दिला आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये सतेज पाटील यांनी महाडीक गटाला नेहमी धोबीपछाड दिला आहे. २०१९ लोकसभा, विधानसभा निवडणूकीत याचा प्रत्यय आला. ज्यानंतर कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतही याचा प्रत्यय दिसून आला आहे.

    follow whatsapp