ऐकावं ते नवलच ! पत्रिकेत पदवी न छापल्यामुळे वराचा लग्नाला नकार, वधूचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई तक

• 07:36 AM • 27 Apr 2022

लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं. परंतू पालघरमध्ये नवरदेवाने एका विचीत्र कारणावरुन लग्न मोडल्यामुळे वधूने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात नवरदेवावर गुन्हा दाखल करुन त्याच्या शोध सुरु केला आहे. पालघरच्या आगरवाडी भागात राहणारा डॉ. जिनीतकुमार गावड यांचं पालघरमधील एका इंजिनीअर मुलीशी लग्न ठरलं होतं. वधू ही पेशाने […]

Mumbaitak
follow google news

लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं. परंतू पालघरमध्ये नवरदेवाने एका विचीत्र कारणावरुन लग्न मोडल्यामुळे वधूने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात नवरदेवावर गुन्हा दाखल करुन त्याच्या शोध सुरु केला आहे.

हे वाचलं का?

पालघरच्या आगरवाडी भागात राहणारा डॉ. जिनीतकुमार गावड यांचं पालघरमधील एका इंजिनीअर मुलीशी लग्न ठरलं होतं. वधू ही पेशाने सिव्हील इंजिनीअर असून ती वसईत नोकरीला होती तर जिनीतकुमार हा विरारमध्येच एका नामांकित फार्मसी कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. 2018 साली जिनीतकुमार आणि सदर मुलीची सोशल मीडियावर ओळख झाली आणि त्या ओळखीचं रुपांतर अखेरीस प्रेमात झालं.

दोन्ही कडच्या घरातील मंडळींनी लग्नाला मान्यता दिल्यानंतर 25 एप्रिलला पालघरमधील एका रिसॉर्टमध्ये विवाहसोहळा पार पडणार होता. 19 एप्रिलला वधूचे आई-वडील परंपरेनुसार मुलाच्या घरी पत्रिका घेऊन आमंत्रणाला गेले असता, पत्रिकेवर मुलाची पदवी छापलेली नसल्यामुळे वराला राग आला आणि त्या रागातून त्याने लग्नाला नकार दिला.

यानंतर 20 तारखेला जिनीतकुमारने आपल्या होणाऱ्या बायकोची भेट घेऊन तिला काही अटी व शर्थींची यादी दिली. या अटी मान्य असतील तरच लग्न होईल असं जिनीतकुमारने सांगितल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी पोलिसांत दिली आहे. मात्र मुलीने या अटी मान्य नसल्याचं सांगताच जिनीतने लग्नास नकार दिला. या घटनांनंतर मुलीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या या तरुणीवर पालघर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

डोंबिवली: क्रीडा प्रशिक्षकाकडून विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, शारिरीक अत्याचार केल्याचं उघड

पोलिसांनी या घटनेत आरोपी वर डॉ. जिनीतकुमार, आई विभा आणि वडील बबन यांच्यावर कलम ३७६ (बलात्कार), ४१७,४२० (फसवणूक), ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे), ३२३ (दुखापत करणे) या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

    follow whatsapp