२६ वर्षीय तरुणीला फेसबूकसोबत अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एका जिम ट्रेनरला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अमित गायकवाड (वय ३४) असं या आरोपीचं नाव असून मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर वाकड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये पीडित तरुणी पुण्यात राहत असताना अमित गायकवाड ज्या जिममध्ये ट्रेनिंग द्यायचा तिकडे व्यायामासाठी जात होती. यावेळी अमितने या मुलीचा फोन नंबर मिळवला. यानंतर अमितने तरुणीला वारंवार फोनवर, सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.
भाडे दिले नाही म्हणून रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पुण्यातली खळबळजनक घटना
काहीवेळा आरोपी या तरुणीचा पाठलाग करुनही तिला सतत त्रास द्यायचा. या त्रासाला कंटाळून पीडित तरुणी कोल्हापूरला राहण्यासाठी गेली. परंतू आरोपीने त्रास देणं सुरुच ठेवल्यामुळे कंटाळून या तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी ही तक्रार दाखल करत आरोपी अमित गायकवाडला तात्काळ अटक केली आहे.
85 व्या वर्षी वडिलांनी विवाह मंडळात नाव नोंदवलं म्हणून मुलाने वरवंटा डोक्यात घालून केलं ठार
ADVERTISEMENT