Thane: राष्ट्रवादीला खिंडार! जगदाळेंसह 5 माजी नगरसेवक जाणार शिंदे गटात

मुंबई तक

10 Feb 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:04 AM)

ncp former corporator will join balasahebanchi shiv sena : ठाणे महापालिका निवडणुकीच्या (thane municipal corporation election) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) खिंडार पडणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी नगरसेवक (former corporator) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात […]

Mumbaitak
follow google news

ncp former corporator will join balasahebanchi shiv sena : ठाणे महापालिका निवडणुकीच्या (thane municipal corporation election) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) खिंडार पडणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी नगरसेवक (former corporator) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात जवळीक वाढली होती. त्यानंतर आता हनमंत जगदाळे यांच्यासह 5 माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. (ncp former corporator hanamant jagdale will join balasahebanchi shiv sena)

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह 5 माजी नगरसेवक लवकरच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. स्वतः हणमंत जगदाळे यांनीच याबद्दल भूमिका मांडली आहे.

जगदाळे यांनी एका निवदेनात म्हटलं आहे की, “गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागाचे नेतृत्व करीत असताना आपण मला कायम साथ दिली. मी जे पुढील पाऊल उचलणार आहे, लोकमान्य, शास्त्री, सहकार नगर या विभागाचा क्लस्टर योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करून घेण्यास मी कटिबद्ध आहे.”

“रविवारी (12 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजता कोरस हॉस्पिटल रोड लक्ष्मी पार्क जवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे”, असं हणमंत जगदाळे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 माजी नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार हणमंत जगदाळे यांच्याबरोबरच आणखी 4 माजी नगरसेवकही शिंदेंच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे. यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यात शिंदे गटाला यश आल्याचं बोललं जात आहे.

काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी येत्या 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे 12 वाजवणार असं म्हणत सूचक विधान केलं होतं. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून जगदाळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढली होती. त्यांच्या अनेक कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली होती.

एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी नगरसेवक यांच्यात वाढत्या जवळकीमुळेच 12 ते 15 माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या चर्चेनं डोकं वर काढलं होतं. दरम्यान, 5 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असून, आणखी काही माजी नगरसेवक शिंदे गटात जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे.

    follow whatsapp