मातोश्रीवर जाऊन हनुमान पठण करण्याचा हट्ट खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांनी सोडला. राणा दाम्पत्यांच्या या निर्णयानंतर शिवसेनेनं पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांचा दौरा सांगून बंटी आणि बबलीने पळ काढला, अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केली.
ADVERTISEMENT
राणा दाम्पत्यांच्या माघारीच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, “काही बोगस घंटाधारी हिंदुत्ववादी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत होते. मुंबईत येऊन मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचन. मातोश्रीमध्ये घुसून हनुमान चालीसा वाचणं. अशा प्रकारची भाषा नुसती वापरली नाही, तर जणू काय महान योद्धे, सत्यवादी आहोत अशा प्रकारचा आव आणून अमरावतीचे बंटी आणि बबली मुंबईत आले. त्यांनी थोडा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.”
Shiv Sena: ‘येऊ दे राणा.. मैं झुकेंगा नही..’, 80 वर्षीय आजीबाईंनी ‘मातोश्री’समोर ठोकला तळ
“मला आता समजलं की पंतप्रधानांचा मुंबईत दौरा आहे आणि त्या दौऱ्याला गालबोट लागू नये, या सबबीखाली त्यांनी पळ काढला. आंदोलन मागे घेतलं म्हणजे पळ काढला, शेपूट घातलं. पंतप्रधानांचा दौरा आहे. त्या दौऱ्याची जबाबदारी ही राज्य सरकारची, महाराष्ट्राची तर आहे. ते एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत. आमचेही आहेत. आम्हालाही त्यांच्याबद्दल आदर आहे. पंतप्रधानांच्या गालबोट लागू नये, लागावा असं महाराष्ट्राला किंवा शिवसेनेला कधीच वाटणार नाही. उलट लागणार असेल, तर तिथे सरकार काय शिवसेना पंतप्रधानांचं रक्षण करण्यासाठी ठामपणे उभी राहिल. जे गालबोट लावू इच्छितात, त्यांचा समाचार घेण्यासाठी.”
“गालबोट लागेल म्हणून माघार घेत आहोत, असं बंटी आणि बबली सांगत आहे, त्यांच्या दावा चुकीचा आहे. हजारोच्या संख्येनं शिवसैनिक रस्त्यावर उतरले. माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय. शिवसैनिकांनी काही रुग्णवाहिकाही तयार ठेवल्या होत्या. बंटी आणि बबलीला न्यावं लागलं तर. हा शिवसैनिकांचा मानवतावादी दृष्टीकोन बघा.”
‘राष्ट्रपती राजवट लावणं इतकं सोपं नाही’; दिलीप वळसे पाटलांनी भाजप-राणा दाम्पत्यांना सुनावलं
“भपंक, बोगस लोक हिंदुत्वाच्या नावाखाली यांच्या खांद्यावर भाजपचे लोक बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. काल आणि आज मातोश्रीमध्ये घुसून काही वेगळं करण्याचं कारस्थान यांनी रचलं होतं. हनुमान चालीसा वाचायची असेल, तर घरात वाचता येते. मंदिरात जाऊन वाचता येते. अशा अनेक जागा अध्यात्माच्या आहेत.”
Rana vs Shiv Sena: मोठी बातमी… ‘मातोश्री’वर जाणार नाही!, नवनीत-रवी राणांनी ‘हट्ट’ सोडला
“महाराष्ट्रात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचं हे कुणाचं कारस्थान आहे. या खासदार बाई आहेत, त्यांचा हिंदुत्वाशी संबंध काय. श्रीरामचं नाव घ्यायला यांचा विरोध होता. बंटी आणि बबलीचा राम अयोध्या आंदोलनाला विरोध होता. हे लोक आज हनुमान चालीसा आणि हिंदुत्व हे शब्द वापरून आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदुत्व अशा घंटाधाऱ्यांचं नाही. आमचं हिंदुत्व घंटाधारी नाही, तर गदाधारी आहे. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही कायम गदा घेतली आहे.”
“दीड शहाण्यांना आम्ही सांगतोय की, शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका. मातोश्रीशी छेडछाड करू नका. २० फूट खाली गाडले जाल. मी हे कॅमेऱ्यांसमोर सांगतोय. शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका. हिंदुत्वाच्या नावाने तुमच्या विषाला उकळी फुटली आहे आणि ती दाबण्याची ताकद शिवसेनेत आहे.”
“मी नागपुरातच आहे. उद्धव ठाकरेंनी मला नागपुरातच राहायला सांगितलं आहे. राष्ट्रपती राजवट कधी आणि का लावली जाते. कोणत्या परिस्थितीत लावली जाते आणि कधी उठवली जाते. सकाळी चार वाजता राजभवन उघडून शपथ घेऊन राष्ट्रपती राजवट उठवणारे कारस्थानी लोक महाराष्ट्राने पाहिले आहेत. कायदा आणि घटना शिवसेनेला कळते, ते आम्हाला शिकवू नका. शिकवायचं असेल, तर राज्यपालांना शिकवा.”
ADVERTISEMENT