ADVERTISEMENT
थंडी हळूहळू कमी होऊ लागली की, होळीच्या सणाची चाहूल लागते.
इतर सणांप्रमाणेच होळीच्या सणाचाही पौराणिक आणि सांस्कृतिक कथा आहेत
होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन, तर दुसऱ्या दिवस रंगपंचमी साजरी केली जाते.
मराठी महिन्यानुसार होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं.
होलिका दहनची कथा विष्णू भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यप आणि होलिका यांच्याशी संबंधित आहे.
होलिकेची आग ही वाईट प्रवृत्ती जाळण्याचं प्रतिक मानली जाते.
होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी वाईटावर चांगुलपणाचा विजय म्हणून रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो.
पौराणिक कथेनुसार, हिरण्यकाश्यपचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूच्या भक्तीत तल्लीन असायचा.
त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्यकश्यपूने बहीण होलिकेला प्रल्हादाला घेऊन आगीत बसण्यास सांगितलं.
होलिकेकडे एक वरदान होतं ज्यामुळे आगीपासून तिला इजा होऊ शकत नव्हती.
असं वरदान असूनही होलिका आगीत जळून भस्म झाली आणि भक्त प्रल्हादाला काहीही झालं नाही.
होलिकाने अधर्माचा स्वीकार करून कपटाने प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. अधर्मावर धर्माचा झालेला विजय म्हणून होळी साजरी करतात.
ADVERTISEMENT