गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाचा संसर्ग; संपर्कात आलेल्यांना दिला सल्ला

मुंबई तक

• 04:52 AM • 28 Oct 2021

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. गृहमंत्री वळसे-पाटील मागील काही दिवसांपासून विविध बैठका आणि कार्यक्रमांमुळे दौऱ्यावर होते. आज त्यांनी ट्वीट करून कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील या आठवड्यात नागपूर-अमरावतीच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी ट्वीट केलं. ज्यात […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. गृहमंत्री वळसे-पाटील मागील काही दिवसांपासून विविध बैठका आणि कार्यक्रमांमुळे दौऱ्यावर होते. आज त्यांनी ट्वीट करून कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे.

हे वाचलं का?

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील या आठवड्यात नागपूर-अमरावतीच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी ट्वीट केलं. ज्यात कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘कोरोना सदृश्य लक्षणं दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.’

‘नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे’, असं आवाहन गृहमंत्री वळसे-पाटील यांनी केलं आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला, तरी अद्याप संसर्गाचं प्रमाण पूर्णपणे थांबलेलं नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर काही आमदारांचा कोरोनामुळे आणि कोरोनानंतर झालेल्या इतर संसर्गामुळे मृत्यू झाला.

    follow whatsapp