मुंबई: महाराष्ट्रात आत्तापर्यंत 1 कोटीच्या वर लसीकरण झालं आहे आणि दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांचं प्रमाण 28 लाखांच्या आसपास आहे. दिसायला हा आकडा मोठा वाटत असला तरी महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा विचार करता हा आकडा फारच कमी आहे. त्यामुळे सध्याच्या लस तुटवड्याच्या काळात आत्ताच्या गतीनुसार लसीकरण झालं तर राज्यातील प्रत्येकापर्यंत लस पोहोचायला बरेच दिवस लागू शकतात. सध्या महाराष्ट्रात लसीकरण अत्यंत धीम्या गतीने चालू आहे. मुंबईतही 9 मेचा लसीकरणाचा आकडा पहिला तर केवळ 21,229 जणांनाच लस दिली गेली आहे.
ADVERTISEMENT
9 मेच्या आकडेवारीनुसार
-
मुंबई – 21,229
-
ठाणे – 2,896
-
पुणे – 6,399
-
नाशिक – 18
-
औरंगाबाद – 447
म्हणजे महाराष्ट्रातली सध्याची लसीकरणाची स्थिती गंभीर आहे हे यातून स्पष्ट होतं. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.2 कोटी इतकी आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात 1 कोटी 80 लाख 88 हजार 042 इतक्या जणांचं लसीकरण झालं आहे. 26 एप्रिलला एकाच दिवशी महाराष्ट्रात 5 लाख 34 हजार जणांचं लसीकरण झालं होतं.
मागच्या तीन दिवसांचा लसीकरणाचा आकडा पाहिला तर 10 मे रोजी 1 लाख 10 हजार 448 जणांचं लसीकरण झालं. 9 मे रोजी 2 लाख 36 हजार 960 जणांचं तर, 8 मे रोजी 3 लाख 63 हजार 765 जणांचं लसीकरण झालं.
18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण थांबलं, याला जबाबदार कोण?
सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटाची एकूण संख्या 5 कोटी 70 लाख आहे. 45 ते 60 वयोगटातील अंदाजे 2 कोटी नागरिक महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला लसीकरणाचा एकूण आकडा जवळजवळ 8 कोटींहून अधिक आहे. आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात कधी 1 लाखांच्या घरात लसीकरण होतं. तर कधी 2 लाख, तर कधी 3 लाख. त्यामुळे आपण सरासरी लसीकरण 3 लाख जरी पकडलं तरी आठवड्याला 21 लाख इतकंच लसीकरण महाराष्ट्रात होत आहे.
म्हणजे महिन्याला 84 लाख जणांचं लसीकरण पार पडेल आणि 8 कोटी जणांचं लसीकरण पूर्ण होण्यासाठी 8 महिन्याचा कालावधी लागू शकेल. त्यात जर लसीकरण हे असंच थांबत राहिलं तर आणखी काही दिवस वाया जातील. मग सरासरी लसीकरण आणखी कमी होईल, असं आपण धरून चाललो तर अंदाजे अधिकचा 1 ते दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो. म्हणजे आत्ताच्या गतीने लसीकरण सुरू राहिलं तर महाराष्ट्रात पुढचे 9 ते 10 महिने तरी लसीकरण पूर्ण होणार नाही.
हॅप्पी हायपोक्सिया: कोरोनाच्या तरुण रुग्णांसाठी ठरतो सायलेंट किलर!
जोपर्यंत सर्वांचं लसीकरण पार पडत नाही तोपर्यंत कोरोनाचा धोका काही पूर्णपणे टळणार नाही. त्यामुळे तोवर कोरोनाचे सर्व नियम म्हणजेच मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिगचं पालन करणं हे क्रमप्राप्त असणार आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला ब्रेक
45 वयाच्या वरील लाखो नागरिकांनाच अद्याप दुसरा डोस मिळू न शकल्याने आता महाराष्ट्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वत: आज (11 मे) पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यामुळे आता मोठा गाजावाजा करुन जे 18 ते 45 या वयोगटासाठी जे लसीकरण सुरु करण्यात आलं होतं त्याला आता ब्रेक लागला आहे.
‘आज घडीला राज्यात 45 वयाच्या वरील ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे पण ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे अशांची संख्या ही 5 लाख एवढी आहे. केंद्र सरकारकडून या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनचे फक्त 35 हजार डोस आपल्याकडे आता उपलब्ध आहे. पण महाराष्ट्र सरकारने 18 ते 44 वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीचे जे पावणे तीन लाख डोस विकत घेतले होते असे मिळून तीन ते सव्वातीन लाख डोस हे आता 45 वयोगटातीला लोकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरले जाणार आहेत.’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई-पुण्यातील लोकांची लसीसाठी ग्रामीण भागात धाव, गावकरी मात्र संतप्त
एवढंच नव्हे तर 45 च्या वरील ज्या नागरिकांनी कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतला आहे पण ज्यांना दुसरा डोस अद्याप मिळू शकलेला नाही अशा लोकांची संख्या ही तब्बल 16 लाख एवढी आहे. जे केंद्र सरकारने देणं गरजेचं आहे. पण अद्याप लस आपल्याला उपलब्ध होऊ शकलेल्या त्यामुळे आता आरोग्य विभागाने सर्व लसीकरण केंद्रांना आदेश दिले आहेत की, 18 ते 44 वयोगटासाठी आलेले लसींचे डोस हे ४५ च्या पुढील नागरिकांसाठी ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे त्यांना प्राधान्याने देण्यात यावेत. अशी माहिती देखील आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.
मात्र, या सगळ्याचा परिणाम आता हा 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणावर होणार आहे. कारण 18 ते 44 वयोगटासाठी आलेल्या लसी या 45 वयाच्या वरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वळविण्यात आले आहेत. एका अर्थी लसीकरणाच्या एकूण कार्यक्रमाला हा एक प्रकारे धक्काच आहे.
ADVERTISEMENT