Maharashtra HSC Result: 2020 साली बारावीच्या निकालाचा नेमका ट्रेंड कसा होता?

मुंबई तक

• 01:05 PM • 29 Jul 2021

HSC Maharashtra Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावीची परीक्षा कोरोना संर्सगामुळे होऊ शकली नाही. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसात निकाल जाहीर होऊ शकतो. त्यामुळे या निकालाकडे (Maharashtra HSC result 2021) विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं. बारावीचा निकाल हा […]

Mumbaitak
follow google news

HSC Maharashtra Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावीची परीक्षा कोरोना संर्सगामुळे होऊ शकली नाही. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसात निकाल जाहीर होऊ शकतो. त्यामुळे या निकालाकडे (Maharashtra HSC result 2021) विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं.

हे वाचलं का?

बारावीचा निकाल हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण इथूनच विद्यार्थी आपल्या करिअरच्या दृष्टीने नवी वाट निवडत असतात. त्यामुळे बारावीचा निकाल हा त्यांच्यासाठी अत्यंत निर्णायक असतो. कोरोना संकटामुळे परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रम कायम होता. अखेर राज्य सरकारने कोरोनाचं संकट लक्षात घेऊन परीक्षा रद्द केली. ज्यानंतर आता अंतर्गंत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर केला जाईल.

दरम्यान, गेल्या वर्षी (HSC Result 2020) राज्यातील बारावीच्या निकालाचा ट्रेंड कसा होता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

2020 साली राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै 2020 हा 90.66 टक्के इतका होता. त्यामुळे आता बारावीचा निकाल किती टक्के लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मागील वर्षीच्या निकालात कोकण विभागानेच बाजी मारली होती. त्यामुळे महाराष्ट्रात बारावीच्या निकाला कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर होतं. कोकण विभागाचा निकाल हा तब्बल 95.89 टक्के एवढा होता. तर सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागला होता. औरंगाबाद विभागाचा निकाल हा 88.18 टक्के एवढा लागला होता.

मुलींनीच मारली होती बाजी

मागील वर्षी बारावीच्या निकालात नेहमीप्रमाणे राज्यात मुलींनीच बाजी मारली होती. 2020 साली 93.88 टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या होत्या. तर 88.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. म्हणजेच मुलांच्या तुलनेने मुलींच्या निकालाची टक्केवारी ही बरीच जास्त होती. जवळजवळ 5 टक्क्यांचा हा फरक होता.

2020 मध्ये बारावीचा विभागानुसार निकाल कसा होता?

मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर आणि लातूर या 9 विभागांमधून परीक्षा घेण्यात आली होती. पण यंदा बारावीची परीक्षा झालेली नसली तरी निकाल याच विभागानुसार जाहीर केला जाईल.

2020 साली विभागानुसार कसा होता बारावीचा निकाल?

  • मुंबई- 89.35 टक्के

  • पुणे- 92.50 टक्के

  • नाशिक 88.87 टक्के

  • नागपूर – 92.65 टक्के

  • कोकण – 95.89 टक्के

  • अमरावती – 92.09 टक्के

  • लातूर -89.79 टक्के

  • औरंगाबाद – 88.18 टक्के

  • कोल्हापूर – 92.42 टक्के

Maharashtra HSC Result 2021:’MSBSHSE’: बारावीच्या निकालाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

2020 शाखानिहाय निकाल नेमका कसा होता? (HSC Result : Streamwise Result)

  • कला (Arts) – 82.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते

  • वाणिज्य (Commerce) – 91.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले

  • विज्ञान (Science) – 96.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

  • व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational courses) – 86.07 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले होते.

    follow whatsapp