वसईतल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरलाय. आफताब पूनावालाच्या निर्दयीपणाची चर्चा सुरू असतानाच टिटवाळ्यात अशीच अंगावर शहारे आणणारी घटना घडलीये. टिटवाळ्यात पतीने कुऱ्हाडीचे घाव घालत पत्नीची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीये.
ADVERTISEMENT
कल्याण जवळ असलेल्या टिटवाळा परिसरात पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी युवक बाळू दुटे याला अटक केली आहे.
कल्याण नजिक टिटवाळ्यात आपटी परिसरात बिंदूसरा फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर युवक दुटे हा कामाला आहे. या ठिकाणी तो त्याच्या पत्नीसोबत राहत होता. युवक दुटे याला दारुचे व्यसन आहे. त्यावरुन पती-पत्नीमध्ये सातत्यानं भांडण होत होती.
‘तुझे तुकडे करून फेकून देईन म्हणतोय’, श्रद्धाने 2 वर्षांपूर्वीच केली होती आफताबची तक्रार
23 नोव्हेंबरच्या रात्री 8 ते 9 वाजताच्या सुमारास पती युवक दुटे आणि पत्नी उषा यांच्यात जोरदार वाद झाला. या वादात युवकने पत्नी उषा हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने प्रहार केला. हा घाव इतका जोरदार होता की, या हल्ल्यात उषा ही जागीच ठार झाली.
तर श्रद्धाचा जीव वाचला असता : तक्रार अर्ज समोर आल्यावर गृहमंत्री अन् पोलीस काय म्हणाले?
या प्रकरणी मयत उषा हिचा भाऊ दत्तू परते याने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर टिटवाळा पोलिसांनी उषाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करत युवक दुटेला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT