कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आजच कर्नाटकात भाजप सरकारची दोन वर्षे पूर्ण झाली आहे. अशात येडियुरप्पा यांनी राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला आहे.. आता भाजप मुख्यमंत्रीपद कुणाला देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार यासाठी काही नावांची यादी भाजपकडे तयार आहे. 2023 मध्ये होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन हे नाव घोषित केलं जाईल असंही सूत्रांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. पक्षश्रेष्ठींचे निर्देश आले की तुम्हालाही त्याबाबत कळेलच, असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. आपण केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य करू याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता. आपण समाधानी असून पक्षाची शिस्त मोडणार नाही, असेही ते म्हणाले होते.
बीएस येडियुरप्पा आज दुपारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. येडियुरप्पा यांनी भाजपा सरकारच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा निर्णय जाहीर केला. दुपारी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांना आपण राजीनामापत्र देणार असल्याचे येडियुरप्पा म्हणाले.
बंगळुरू येथील कर्नाटक विधान सौधा येथे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा सरकारच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमाच्या वेळी भाषणादरम्यान भावूक झाले होते. आज दुपारी जेवणानंतर मी राज्यपालांना भेटणार आहे आणि माझा राजीनामा देणार आहे. ज्यावेळी कोणतीही गाडी तेव्हा नव्हती तेव्हा पक्ष उभा करण्यासाठी मी सायकल चालवत होतो. ही आठवणही त्यांनी सांगितली. तसंच पुन्हा एकदा मोदींची सत्ता केंद्रात यावी ही माझी इच्छा आहे असंही येडियुरप्पा यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT