Nitin Gadkari: ‘मी माझे वर्षभराचे 1 लाख रुपये असे वाचवले’, पाहा गडकरी काय म्हणाले

मुंबई तक

• 04:00 PM • 31 Jan 2022

कल्याण: ‘देशात आता बायो इंधनाची गरज आहे आणि त्याचा वापर केल्यास आपण आपले बरेच पैसे वाचवू शकतो. मी स्वत: माझे वर्षभराचे लाखभर रुपये वाचवले आहेत.’ असं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले. आपले वर्षभराचे एक लाख रुपये कसे वाचले याबाबतचा एक किस्साच त्यांनी यावेळी सांगितला आहे. कल्याणमधील सुभेदार वाडा कट्टाच्या वतीने रामभाऊ कापसे स्मृती व्याखानमालेचं […]

Mumbaitak
follow google news

कल्याण: ‘देशात आता बायो इंधनाची गरज आहे आणि त्याचा वापर केल्यास आपण आपले बरेच पैसे वाचवू शकतो. मी स्वत: माझे वर्षभराचे लाखभर रुपये वाचवले आहेत.’ असं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले. आपले वर्षभराचे एक लाख रुपये कसे वाचले याबाबतचा एक किस्साच त्यांनी यावेळी सांगितला आहे. कल्याणमधील सुभेदार वाडा कट्टाच्या वतीने रामभाऊ कापसे स्मृती व्याखानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी गडकरींनी व्हर्च्युअल माध्यमातून हजेरी लावली होती.

हे वाचलं का?

पाहा या कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले गडकरी…

‘आपण आपल्या देशात डिझेल बरंच वापरतो. डिझेल हे फारच खराब आहे, धोकादायक आहे. डिझेलमुळे सर्वाधिक प्रदूषण होतं. आपण शहरी भागातील लोकं जे डॉक्टरांची बिलं देतो त्यात 50 टक्के प्रदूषण हेच कारण आहे. म्हणून येत्या काळात डिझेलच्या ऐवजी आपण LNG चा वापर केला पाहिजे.’

‘कारण LNG आणि CNG हेच भविष्यातील इंधन असणार आहे. आता समजा आपण एक ट्रक LNG मध्ये रुपांतरित केली तर त्याची किंमत आठ लाख रुपये एवढी आहे. पण ही किंमत 290 दिवसात वसूल होते.’

‘मी काही दिवसांपूर्वी नागपूरहून एक LNG बस सुरु केली. आता ठाणे ते नाशिक ही LNG AC बस सुरु केली तर तुमचं तिकिट 30 टक्क्यांहून कमी होईल. कारण LNG हे इंधन स्वस्त आहे. CNG तर देशात मोठ्या प्रमाणात आलं आहे.

‘CNG प्रत्येक ठिकाणी दळणवळणाने पोहचवणं ही कठीण बाब आहे. पण LNG बाबत तसं नाही. आता कालच माझ्याकडे ESSAR कंपनी आहे त्यांनी दोन ट्रक नागपूरला माझ्याकडे आणले होते. ते त्यांनी पूर्ण एलएनजीवर बनवले आहेत.’

‘मुंबई ते दिल्ली भाडं समजा एक लाख रुपये असेल तर LNG ट्रक असल्यास फक्त 60 हजार रुपये लागतील. म्हणून आपण LNG वर लक्ष केंद्रीत केलं आहे.’

‘दुसरी गोष्ट म्हणजे CNG.. आता आपण सगळीकडे पाइपलाइनने CNG पुरवणार आहोत. त्यामुळे येत्या काळात गॅस इकोनॉमी देशात विकसित होणार आहे. यात आम्ही असं केलं हाच LNG पाच टन राइस स्ट्रॉपासून आपण बायो एलएनजी तयार करु शकतो.’

‘आता आम्ही नागपूरला प्रयोग केला. माझा स्वत:चा ट्रॅक्टर मी बायोसीएनजीवर रुपांतरित केला. त्यामुळे माझी वर्षाची एक लाख रुपयांची बचत झाली आहे. ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तांदूळ पिकवला जातो. याच्याच तणापासून सीएनजी, एलएनजी तयार झाल्या तर त्यामुळे बरीच इंधन निर्मिती होऊ शकते.’

गडकरी youtube वरुन महिन्याला चार लाख कसे कमावतात?; काय करावं लागतं?

‘या सगळ्यात आता इलेक्ट्रिक हे देखील आता इंधन झालं आहे. कारण आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक गाड्या आल्या आहेत. आता माझ्याकडे नागपूरला मी इलेक्ट्रिक गाडीमध्ये फिरतो. ज्या गाडीला मला महिन्याभरासाठी 15 हजाराचं पेट्रोल लागत होतं ते तिथे इलेक्ट्रिक गाडीमुळे इंधन खर्च फक्त 2 हजार आला. पण इलेक्ट्रिक गाडी महाग आहे.’ असं गडकरी यावेळी म्हणाले.

    follow whatsapp