सध्या सोशल मीडियावर ट्रोल करण्याचं प्रमाण फार वाढलंय. अभिनेते किंवा कलाकार यांना आजकाल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. कधी फोटोवरून तरी कधी फोटोंच्या कॅप्शनमुळे देखील कलाकार ट्रोल होताना दिसतात. मात्र अनेक कलाकार या ट्रोलिंगला न जुमानता ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतात. असंच नुकतंच मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
नुकतंच सोनाली कुलकर्णीने दुबईमध्ये कुणाल बेनोडेकर याच्यसोबत लग्नगाठ बांधली. यानंतर सोनाली लग्नाचे काही फोटोस सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंवर सोनालीच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र काहींनी सोनालीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी एका व्यक्तीने सोनालीला दुबईत लग्न करण्यावरून ट्रोल केलं. तो युजर म्हणाला, “परदेशात मजा करत आहेत. मदत करा म्हणावं कोविडसाठी.” यावर सोनालीनेही सडेतोड उत्तर दिलंय. ती म्हणते, “’खरंच? तुम्ही, आम्ही केलेली मदत पाहिली नाही म्हणून आम्ही काहीच केलं नाही किंवा काही करतच नाही असं होत नाही. मी काय मदत केलीये ते बोंबलून सांगणं मला तरी योग्य वाटत नाही. सगळ्यांना एकाच पठडीत बसवणं चुकीचं आहे.”
तर एका ट्रोलरने म्हटलंय, ‘मला वाटलं अमेरिकेत लग्न केलं असेल आणि लग्न दुबईत केलं म्हणजे मुलं तिथे होतील पण अशी शक्यता नाही.’ यावरही उत्तर देताना सोनाली म्हणाली, “तुम्हाला काहीही वाटू शकतं आणि तुम्ही आम्हाला काहीही बोलू शकता. हे आता खपवून घेणार नाही. किमान मी तरी नाही. समाजभान ठेवून वागणं, समाजाला देणं लागणं, देऊ करणं, जबाबदार नागरिक म्हणून वावरणं, माणुसकी जपणं हे सगळं आम्ही करायचं आणि तुम्ही फक्त बसून अशा फुकट कमेंट टाकायच्या.”
ADVERTISEMENT