राज ठाकरेंना कोणती अभिनेत्री आवडते? मुलाखतीत मनसेप्रमुखांनी दिलं उत्तर

मुंबई तक

• 03:05 AM • 22 Mar 2023

गुढीपाडव्यानिमित्त (22 मार्च) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा होणार असून, मुंबईतील शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची सभा होणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडी, आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याआधी राज ठाकरेंनी लोकमान्य सेवा संघातर्फे शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त ‘कलात्मक मनाचे कवडसे’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

गुढीपाडव्यानिमित्त (22 मार्च) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा होणार असून, मुंबईतील शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

राज्यातील राजकीय घडामोडी, आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

याआधी राज ठाकरेंनी लोकमान्य सेवा संघातर्फे शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त ‘कलात्मक मनाचे कवडसे’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. तसंच मुलाखतीदरम्यान त्यांना राजकारणाव्यतिरिक्त प्रश्नही विचारण्यात आले.

तुमची आवडती नटी कोण? असा प्रश्न राज ठाकरेंना विचारला गेला.

यावर राज ठाकरे म्हणाले, ‘मला पूर्वीपासून आतापर्यंत आवडलेली नटी म्हणजे फक्त हेमा मालिनी आहे.’

‘हेमा मालिनीच्या चेहऱ्यावर जितकं पावित्र्य आहे, तितकं मला वाटत नाही दुसऱ्या कोणत्या नटीच्या चेहऱ्यावर असेल’, राज ठाकरे म्हणाले.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp