इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी सातारा
ADVERTISEMENT
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गुरूवारी रात्री एकाच वेळी 21 बंद घराच्या घरफोडी करून रोख रक्कम सोने आदी साहित्य लंपास केला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना जावळी तालुक्यातील करंजे, सावली, आसणी, भोगवली, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी आणि वरोशी या पाच गावातील एकूण २१ बंद घरं फोडून झाल्याचं उघडकीस आलं आहे. मध्यरात्री घरफोडी झाली असून चोर लाखो रुपयांची रोख रक्कम आणि साहित्य घेऊन पसार झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे जावळी तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका रात्रीत 15 गावातील 21 घर रातोरात फोडून किमती ऐवज रोख रक्कम आणि साहित्य अज्ञात चोरट्यांनी घेऊन गेल्याने तालुक्यातील ही पहिलीच घटना घडल्याने पोलिस यंत्रणेच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे
दरम्यान हा सर्व प्रकार होत असतानाच जावली तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांचे गाव चोरांबे गावांत चोरीचा प्रयत्न फसून गावाच्या सी. सी. टी. व्ही. मध्ये कैद झाले आहेत . आज सकाळी सातच्या दरम्यान याची माहिती मेढा पोलिसांनाच लाकताच सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी घटना स्थळी भेटी देवून तपास गतिमान केला आसून श्वान पथक बोलवले आहे .
जावळीत ही एकाच रात्रीत बंद घरांची घरफोडी घडण्याचा प्रकार अनेक वेळा घडला असला तरी एकाच वेळी २१ घरफोड्या होण्याचा मोठी घटना घडली असून पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचा आहे दरम्यान अनेक गावात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्यामुळे अशा
चोर्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे ते जर गावात सीसीटीव्ही असतील तर या घरफोड्या थांबतील. सुदैवाने हत्या, हल्ला असा अनुचित प्रकार घडला नसला तरी ही टोळी मोठी असणार आहे. त्यांनी बंद घरांना लक्ष केले असले तरी त्यांचे टाळे तोडणे घरातील तिजोरी फोडणे त्यातील साहित्य अस्थाव्यस्थ करणे यासाठी त्यांनी अत्याधुनिक साहित्याचा वापर केल्याचा अंदाज आहे .
या घरफोडीत चोरांनी करंजेमध्ये दोन घरे, सावलीत दोन घरे, आसणीत आठ घरे, भोगवलीत दोन घरे, पुनवडीत एक घर, केडंबेत तीन घरे, वाळंजवाडीत एक घर व वरोशीत एक घर अशी २१ घरे एका रात्रीत फोडून नेली आहेत . यामध्ये किती कोणाचे नुकसान झाले आहे हे नेमके समजू शकले नसले तरी लाखोचा ऐवज लंपास झाल्याचा अंदाज आहे .या एकूण वातावरणामुळे पश्चिम जावळीत भितीचे वातावरण झाले आहे .
जावळी सहकारी बँकेचे चेअरमन राजाराम ओंबळे (रा केडंबे ) आणि नुकतेच सेवानिवृत्त झोलेले पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय किर्दत रा . करंजे यांचीही घरे या घरफोड्यांनी लक्ष केली आहेत .
ADVERTISEMENT