केरळ: एकीकडे देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची (Coronavirus Cases in India) संख्या कमी होत आहे आणि पण दुसरीकडे केरळमधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक झाली आहे. आता एका अशी बातमी समोर आली आहे की, ज्यामुळे प्रशासनाचे देखील धाबे दणाणले आहेत.
ADVERTISEMENT
देशातील पहिल्या कोरोना रुग्णाला (फर्स्ट कोविड पेशंट) पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. याच रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पण सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याने या रुग्णाला घरीच क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
भारतातील पहिली कोरोना रुग्ण ही मेडिकल स्टुडंट होती. जी गेल्या वर्षी चीनच्या वुहानहून (Wuhan) परतली होती. वुहान हे तेच शहर आहे जिथे कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भावही झाला होता आणि त्याचा पहिला रुग्णही इथेच सापडला होता. त्यामुळे वुहानहून भारतात परतलेल्या मेडिकल स्टुडंटला देखील याची लागण झाली होती.
भारतातील पहिली कोरोना रुग्ण ही केरळच्या त्रिशूरची रहिवासी आहे आणि ती वुहानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. गेल्या वर्षी 30 जानेवारीला तिचा कोव्हिड रिपोर्ट (Covid Report) हा पॉझिटिव्ह आला होता. देशातील कोरोनाचे हे पहिलेच प्रकरण होते.
दरम्यान, सुदैवाने ती जीवघेण्या कोरोनातून सुखरुपपणे बरी झाली होती. पण आता जवळपास दीड वर्षानंतर तिला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. डीएमओ डॉ. के.जे. रीना यांनी सांगितले की अद्याप तिच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत म्हणजेच ती असिम्प्टॅटिक (Asymptomatic) आहे. त्यामुळे तिला घरीच क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे.
तसंच तिच्यावर सातत्याने डॉक्टरांच्या एका टीमला नजर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, त्यांनी यावेळी अशीही माहिती दिली की, तिने आतापर्यंत लसदेखील घेतली नव्हती. दुसरीकडे आता भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची देखील इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
दरम्यान, ही काही पहिली घटना नाही की, ज्यामध्ये एखाद्याला व्यक्तीला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. देशात आणि जगात असे अनेक रुग्ण सापडले आहेत की, ज्यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. पहिल्यांदा कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना संसर्ग होणं शक्य असल्याचं याआधीच तज्ज्ञांनी स्पष्ट केलं होतं. यावर उपाय म्हणजे लवकरात लवकर लस घेणं आणि कोरोना नियमांचं सातत्याने पालन करणं हाच आहे.
तिसरी लाट येणारच, निर्बंध शिथील करु नका! IMA चं केंद्र आणि राज्य सरकारला पत्र
फेब्रुवारी 2020 मध्ये बरी झाली होती देशातील पहिली कोरोना रुग्ण
देशातील पहिली कोरोना रुग्ण ही वुहान विद्यापीठातील तृतीय वर्षाची वैद्यकीय विद्यार्थी होती. गेल्या वर्षी ती सुट्टीसाठी आपल्या घरी परतली होती आणि 30 जानेवारीला तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जवळजवळ तीन आठवड्यांपर्यंत तिच्यावर थ्रिसूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते आणि 20 फेब्रुवारी 2020 रोजी तिला डिस्चार्ज मिळाला होता.
ADVERTISEMENT