Pfizer, J & J, Moderna यांच्यासोबत कोरोना प्रतिबंधक लसी मिळवण्यासाठी भारत सरकारने चर्चा सुरू केली आहे. आत्तापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या या कंपन्यांसोबत पार पडल्या आहेत. फायजर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या तिन्ही कंपन्यांना आम्ही लसी पुरवण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेच्या तुलनेत महाभयंकर अशी लाट ठरली आहे. अशात लसीकरण करून जास्तीत लोकांना सुरक्षित करणं हे सरकारचं उद्दिष्ट होतं मात्र लसींचा तुटवडा भासू लागला आहे. भारतात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. तिसरी लस आहे ती म्हणजे रशियाची स्पुटनिक व्ही. यासोबतच इतर कंपन्यांशीही भारत सरकारने चर्चा सुरू केली आहे.
ADVERTISEMENT
या कंपन्यांना लसींचा पुरवठा व उत्पादन करण्यासाठी सरकारने सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं आहे असे सरकारने एका निवेदनात म्हटले आहे. “मान्यताप्राप्त कोणत्याही परदेशी उत्पादकाचा कोणताही अर्ज औषध नियंत्रकांकडे प्रलंबित नाही असंही केंद्राने स्पष्ट केलं आहे.
Vaccination बाबत मोदी सरकारच्या कोणत्या चुकीच्या निर्णयांमुळे भासतोय लस तुटवडा?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर माजवला आहे. अनेकांना कोरोनाचा संसर्ग होतो आहे तसंच अनेकांचे मृत्यूही झाले आहेत. कोरोनाची पहिली लाट दुसऱ्या लाटेपेक्षा काहीशी सौम्य होती असं म्हणायची वेळ आली आहे इतकी दुसरी लाट भीषण आहे. दुसऱ्या लाटेमध्ये लसीकरणावर भर देण्यात आला आहे. तरीही देशातल्या अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा भासतो आहे.
जगातला सर्वात मोठा लसीकरण उत्सव असं आपण आपल्या लसीकरण मोहीमेचं वर्णन केलं. मात्र जानेवारी महिना ते मे महिना या कालावधीतलं लसीकरण पाहिलं तर लक्षात येतं की मागील काही दिवसांपासून लसीकरण मोहिम मंदावली आहे. याच गतीने जर लसीकरण होत राहिलं तर दोन, तीन कितीही वर्षे लसीकरणासाठी लागू शकतात.
Allopathy चा अभ्यास केला आहे का? विचारत मुंबईच्या डॉ. लेलेंनी केली बाबा रामदेव यांची बोलती बंद
मार्च महिन्यात देशभरात रोज 16 लाख लोकांचं लसीकरण होत होतं. एप्रिलच्या सुरूवातीला रोज 35 लाख लसी रोज दिल्या जात होत्या. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हे प्रमाण 21 लाख लसींवर आलं. मे महिन्याच्या सुरूवातीला हे प्रमाण घसरून पुन्हा 16 लाख लसी रोज यावर आलं. त्यामुळे हे लक्षात येतं की आपला वेग हा आता मार्च महिन्यासोबत येऊन ठेपला आहे कारण आपण 18 ते 44 या वयोगटाला घाईने या मोहिमेत सहभागी करून घेतलं. 1 एप्रिल आणि 1 मे या दोन दिवसांची तुलना केली तर लक्षात येतं की 1 एप्रिलला देशभरात 36 लाख लोकांचं लसीकरण झालं होतं जे 1 मे रोजी 18 लाख लोकांचं झालं म्हणजेच एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात लसीकरण पन्नास टक्क्यांवर आलं. आता लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे बाहेरच्या देशांमधल्या लसींसाठीही आता केंद्र सरकारने चर्चा सुरू केली आहे.
ADVERTISEMENT