युक्रेनमधील खार्किव्ह शहरात वैद्यकीय शिक्षण घेणारा भारतातील नवीन शेखरप्पा रशिया-युक्रेन संघर्षाचा बळी ठरला. मंगळवारी जेवण आणण्यासाठी बाहेर पडलेला नवीन माघारी परतलाच नाही, आली ती त्याच्या मृत्यूची बातमी! भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नवीनचा मृत्यू गोळीबारात झाल्याचं म्हटलेलं आहे. आता त्याच्या मृत्यूबद्दल आणखी माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
२४ फेब्रुवारीपासून सुरु असलेल्या रशिया-युक्रेन संघर्षात आतापर्यंत शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. या रक्तरंजित संघर्षात आता भारतीय तरुणालाही जीव गमवावा लागला. युक्रेनच्या खार्किव्ह शहरात राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठात नवीन मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला होता. तो मूळचा कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात असलेल्या चलगिरी येथील आहे.
रशिया-युक्रेन युद्ध : नको होतं तेच घडलं! युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर नवीनचा मृत्यू नेमका कसा झाला? याबद्दलचीही चर्चा होत आहे. खार्किव्हमध्ये विद्यार्थी समन्वयक असलेल्या पूजा प्रहराज यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला ज्या घटनेत नवीनचा मृत्यू झाला. त्याबद्दलची माहिती दिली.
पूजा प्रहराज म्हणाल्या, “तो (नवीन) फक्त खाण्यासाठी काहीतरी आणायला गेला होता. आम्ही हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना जेवण पुरवतो, पण तो गव्हर्नर हाऊसच्या पाठीमागे असलेल्या फ्लॅटमध्ये थांबलेला होता. जेवणासाठी तो एक ते दोन तासांपासून रांगेत उभा होता. त्याचवेळी अचानक हवाई हल्ला झाला, ज्यात गव्हर्नर हाऊस उडवण्यात आलं आणि नवीनही मारला गेला.”
रशिया-युक्रेन युद्ध: दुतावासाची लोकं विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली नाही! नवीनच्या वडीलांचा आरोप
त्याचा फोन एका युक्रेनीयन महिलेनं उचलल्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी कळाली. त्याच्या फोनवरुन बोलताना त्या महिलेनं सांगितलं की, हा फोन ज्या व्यक्तीचा आहे, त्याला शवागारात घेऊन जाण्यात येत आहे, अशी माहिती पूजा यांनी दिली.
तर नवीनचा हॉस्टेलचा सहकारी असलेल्या श्रीधरन गोपालकृष्णन याने मात्र वेगळी माहिती दिली. मी नवीनला शेवटचं सकाळी साडेआठ वाजता बघितलं होतं. नवीन युक्रेनियन वेळेप्रमाणे सकाळी १०:३० वाजता हल्ल्यात मारला गेला. तो किराणा दुकानासमोरील रांगेत उभा होता, त्याचवेळी रशियन लष्कराने लोकांवर गोळीबार केला. त्याच्या मृतदेहाबद्दलची आम्हाला कोणतीही माहिती नाही. आमच्यापैकी कुणीही हॉस्पिटलला जाऊ शकलं नाही’, असं श्रीधरनने सांगितलं.
जागोजागी पडलेले मृतदेह अन् मृत्यूला चकवणारी माणसं; युक्रेनमधील मन थिजवून टाकणारी दृश्ये
दरम्यान, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एका स्फोटाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा स्फोट खार्किव्हमधील फ्रीडम स्वेअर येथे झालेला असून, स्फोट होतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Kharkiv च्या बंकरमध्ये अडकली मराठी मुलं, समोर आली बंकरची खरी परिस्थिती
सेंट्रल फ्रीडम स्वेअर आणि खार्किव्हमधील नागरी जिल्ह्यांवर रशियाकडून निर्दयी मिसाईल हल्ले. युक्रेनला नेस्तनाबूत करण्यात अपयशी ठरले आहेत. आता त्वेषाने जास्त युद्ध हिंसा करत आहेत. जग खूप काही करु शकते आणि केलं पाहिजे. रशियावर दबाव टाका आणि वेगळं पाडा,” असं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT