युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण, व्हीडिओ आला समोर

मुंबई तक

• 02:28 AM • 28 Feb 2022

युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष युद्धात परिवर्तित झाला आहे. युक्रेनने रशियासमोर हात टेकलेले नाहीत. उलट दोन हात करून रशियासोबत युद्ध सुरू केलं आहे. जसा देता येईल तसा निकराचा लढा युक्रेनकडून दिला जातो आहे. अशात तिथे भारतीय विद्यार्थीही अडकून पडले आहेत. रशियाचं सैन्य युक्रेनमधल्या नागरी वसाहतींनाही लक्ष्य करतं आहे. भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी भारताकडून पूर्ण […]

Mumbaitak
follow google news

युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष युद्धात परिवर्तित झाला आहे. युक्रेनने रशियासमोर हात टेकलेले नाहीत. उलट दोन हात करून रशियासोबत युद्ध सुरू केलं आहे. जसा देता येईल तसा निकराचा लढा युक्रेनकडून दिला जातो आहे. अशात तिथे भारतीय विद्यार्थीही अडकून पडले आहेत. रशियाचं सैन्य युक्रेनमधल्या नागरी वसाहतींनाही लक्ष्य करतं आहे. भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी भारताकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. काही विद्यार्थ्यांना परत आणलंही गेलं आहे. मात्र आता युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा व्हीडिओ समोर आला आहे.

हे वाचलं का?

धगधगतं युक्रेन! बेलारुसच्या सीमेवर रशियन शिष्टमंडळाला भेटण्यास तयार- झेलेन्स्की

युक्रेनमध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर थंडी आहे. त्याचाही सामना सगळ्यांनाच करावा लागतो आहे. अशात भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण झाली आहे. युक्रेनच्या सीमेवर रात्रीच्या सुमारास युक्रेनच्या सुरक्षारक्षकाने भारतीय विद्यार्थ्याला लाथ मारली तो व्हीडिओ व्हायरल होतो आहे. संयुक्त राष्ट्राच्या सभेत भारताने युक्रेनच्या बाजूने मत का दिलं नाही? असा जाब तुमच्या भारतीय दुतावासाला विचारा असंही हा रक्षक या विद्यार्थ्याला उद्देशून म्हणतो आहे.

युक्रेनमधून आत्तापर्यंत 800 हून अधिक विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आलं आहे. मात्र साधारण 15 हजार भारतीयांना युक्रेनहून भारतात आणलं जायचं आहे. युद्ध सुरू झाल्याने खाण्यापिण्याची टंचाई, त्यानंतर झालेली ही मारहाण या सगळ्यामुळेच आपल्या मुलांचं काय होणार ही चिंता भारतात असलेल्या पालकांना सतावते आहे.

हंगेरी आणि पोलंडच्या सीमेवर शून्याहून कमी तापमान आहे. या कडाक्याच्या थंडीत भारतीय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यांना सीमा ओलांडण्यास संमती दिली गेलेली नाही. त्यामुळे हे विद्यार्थी अडकून पडले आहेत.

अश्रू,आक्रोश आणि धगधगणारं युक्रेन!

रशियाने गुरुवारी पहाटे युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर युक्रेनमध्ये आतापर्यंतचा मोठा विध्वंस पाहायला मिळत आहे. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थीही अडकले आहेत. ज्यांना गेल्या काही दिवसांपासून एअरलिफ्ट केले जात होते. आताही केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे.

युक्रेनमधील भारतीय दुतावासाने भारतीय नागरिकांना सांगितले आहे की, युक्रेनमधील सध्याची परिस्थिती अनिश्चित स्वरुपाची आहे. तुम्ही आता जिथे कुठे आहात तिथे शांततेत आणि सुरक्षितत राहा. मग ते तुमचे घर असो, वसतिगृह असो किंवा इतर कुठेही असंही विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं आहे.

    follow whatsapp