सांगवीमध्ये पाच वर्षांच्या चिमुरड्याची अमानुष हत्या, शेजारच्या घरात सापडला मृतदेह

मुंबई तक

• 08:54 AM • 17 Dec 2021

गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका पाच वर्षीय बालकाचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला आहे. या लहान मुलाच्या शरीरावर जखमा असून गळा दाबून खून केल्याचे प्रथमदर्शी दिसून येते आहे.  ओम मनोज बागल असे या बालकाचे नाव असून गुरूवारी दुपारी हा लहान मुलगा गोळी […]

Mumbaitak
follow google news

गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद

हे वाचलं का?

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका पाच वर्षीय बालकाचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला आहे. या लहान मुलाच्या शरीरावर जखमा असून गळा दाबून खून केल्याचे प्रथमदर्शी दिसून येते आहे. 

ओम मनोज बागल असे या बालकाचे नाव असून गुरूवारी दुपारी हा लहान मुलगा गोळी आणण्यासाठी घराबाहेर पडला होता त्यानंतर तो घरी परतला नसल्याने एकच खळबळ उडाली.

घरच्यांनी रात्रभर शोध घेतला मात्र हा मुलगा सापडू शकला नाही. आज शुक्रवारी सकाळी या मुलाच्या घराशेजारील असलेल्या एका घरात त्याचा मृतदेह सापडला त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. या मुलाच्या दोन्ही कानात सोन्याचे कानातले होते, ते गायब आहे. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मात्र या मुलाची हत्या का करण्यात आली? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनास्थळी डॉग स्क्वॉड आले आहे. तुळजापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत .पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    follow whatsapp