Vijaykumar deshmukh : सोलापुरात भाजपच्या आमदारांवर शाई फेकण्याचा प्रयत्न

मुंबई तक

• 02:50 AM • 14 Dec 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप नेत्यांकडून केल्या गेलेल्या वक्तव्याचे पडसाद अजूनही महाराष्ट्रभर उमटत आहेत. अशाच वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावरून पिंपरी चिंचवडमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाई फेक करण्यात आली. त्यानंतर असाच प्रकार सोलापूर घडता घडता राहिला. सोलापुरात भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावरही शाई फेक करण्याचा प्रयत्न झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, चंद्रकांत पाटील […]

Mumbaitak
follow google news

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप नेत्यांकडून केल्या गेलेल्या वक्तव्याचे पडसाद अजूनही महाराष्ट्रभर उमटत आहेत. अशाच वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावरून पिंपरी चिंचवडमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाई फेक करण्यात आली. त्यानंतर असाच प्रकार सोलापूर घडता घडता राहिला. सोलापुरात भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावरही शाई फेक करण्याचा प्रयत्न झाला.

हे वाचलं का?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या विधानांवरून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. यावरून काही तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शाई फेक करण्यात आली होती.

पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती सोलापूरमध्येही घडली. मात्र, पोलीस आणि उपस्थितांच्या सर्तकेतेमुळे आमदारावर शाई फेक करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा प्रयत्न फसला.

अजित पवारांनी बोलता बोलता जयंत पाटलांनाही सुनावले खडेबोल? ‘त्या’ भाषणाची का होतेय चर्चा?

आमदार विजयकुमार देशमुखांवर शाई फेकीचा प्रयत्न, काय घडलं?

सोलापूरमधील सम्राट चौक परिसरातील न्यू बुधवार पेठ येथील बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन मंगळवारी (13 डिसेंबर) सायंकाळी करण्यात आलं होतं.

या सोहळ्यास सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी भीम आर्मी संघटनेच्या अजय मैंदर्गीकर यांनी आमदार देशमुख यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शाई फेकण्याच्या प्रयत्नात असलेल्या अजय मैंदर्गीकर याला तात्काळ ताब्यात घेतलं.

चंद्रकांत पाटील शाई फेक प्रकरणात समोर आलं ‘बारामती’ कनेक्शन; 13 जणांवर गुन्हा

वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापलं

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे रोष व्यक्त होताना दिसत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबरोबरच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड यांनीही विधानं केली. तर चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल विधान केलं होतं.

वादग्रस्त विधानांच्या मालिकेवरून विरोधी पक्ष आणि विविध संघटनांकडून माफीची मागणी होतेय. तर भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी होतेय. महापुरुषांबद्दल केल्या जात असलेल्या वक्तव्याप्रकरणी महाविकास आघाडीने मोर्चाची हाक दिलीये. त्यामुळे दिवसेंदिवस वातावरण तापू लागलेलं आहे.

    follow whatsapp