Appleचा नवा कोरा हँडसेट iPhone 16e आता भारतात तयार केला जातोय. भारतात बनवलेला हा हँडसेट भारतात तसंच जगातील इतर अनेक देशांमध्ये विकला जाणार आहे. अॅपलने गुरुवारी ही माहिती दिली. बुधवारी रात्री भारतासह जागतिक बाजारात iPhone 16e लाँच करण्यात आला, हा आयफोन 16 मालिकेतील सर्वात स्वस्त हँडसेट आहे.
ADVERTISEMENT
Apple iPhone 16e ची प्री-ऑर्डर शुक्रवारपासून म्हणजेच 21 फेब्रुवारीपासून सुरू होईल. 28 फेब्रुवारीपासून हा फोन सर्व अॅपल स्टोअर्स आणि पार्टनर स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल. Apple ने गुरुवारी सांगितले की, iPhone 16e सह iPhone 16 लाइनअपमधील सर्व मॉडेल्स, भारतात असेंबल केले जात आहेत. हे हँडसेट भारतात विकले जातील आणि जगातील अनेक देशांमध्ये निर्यातही केले जातील.
iPhone 16e ची किंमत किती?
रुवातीची किंमत 59,000 रुपये आहे. या किमतीत 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध असणार आहे. याशिवाय, तुम्हाला 256 जीबीसाठी 69,000 रुपये आणि 512 जीबी स्टोरेजसाठी 89,000 रुपये खर्च करावे लागतील. हा फोन काळा आणि पांढरा अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
Apple iPhone 16e मधील हे आहेत फीचर्स
Apple iPhone 16e चा हा प्रकार A18 चिपसह सादर करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये अॅपल इंटेलिजेंस, 48 एमपी फ्यूजन कॅमेरा उपलब्ध असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
